शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

प्रश्न प्रलंबित ठेवणाऱ्या अधिका-यांवर कारवाई करा, सफाई कामगार प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 01:43 IST

सफाई कामगारांचे प्रश्न प्रलंबित ठेवणाºया अधिकाºयांवर कठोर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश राज्य सफाई कर्मचारी आयोगाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

पिंपरी - सफाई कामगारांचे प्रश्न प्रलंबित ठेवणाºया अधिकाºयांवर कठोर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश राज्य सफाई कर्मचारी आयोगाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. कारवाईची माहिती कळवावी, असेही आदेश दिले आहेत.पिंपरी - चिंचवड महापालिका आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सागर चरण यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली. ते म्हणाले, महापालिका आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीकडे सुमारे ६०० सफाई कर्मचाºयांकडून दहा महिन्यांत तब्बल १४० तक्रारी आल्या. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग आणि केंद्रीय सामाजिक न्याया मंत्रालयाने याची दखल घेत महापालिका आयुक्तांना नोटीस दिली. तसेच, सफाई कामागरांच्या समस्या ३० दिवसांत मार्गी लावण्याचे निर्देश दिले. मात्र, दिलेल्या मुदतीत सफाई कर्मचाºयांच्या समस्यांवर कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. या तक्रारींना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ‘केराची टोपली’ दाखविली.राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग आणि केंद्रीय सामाजिक न्याया मंत्रालयाने दिशाभूल व कामचुकारपणा केल्याबद्दल कार्यकारी आरोग्य अधिकाºयांवर कारवाईचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र, आयुक्तांनी कारवाई करण्यासाठी सहायक आयुक्तपदी बढती दिली आहे. आता राज्य सफाई कर्मचारी आयोगाने अधिकाºयांवर केलेल्या कारवाईची माहिती कळवावी, असेही आदेश दिले आहेत.१आजही महापालिकेमार्फत सफाई कर्मचाºयांना सुरक्षा साधने दिली जात नाहीत. मास्क, हातमोजे, गमबुट, बारा साबण, सहा मोठे हातरुमाल, दरमहा दोन झाडू नियमितपणे दिले जात नाहीत. पावसाळा संपल्यावर हिवाळ्यामध्ये रेनकोटचे वाटप करण्यात आले. आता हिवाळ्यातील स्वेटर उन्हाळ्यात मिळेल, अशी परिस्थिती आहे. महिला सफाई कर्मचाºयांना आरोग्य कोठीत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि ‘चेंजिंग रुम’ उपलब्ध नाही.२तक्रारकर्त्या महिलांना अधिकारी अवमानकारक वागणूक देतात. सफाई कर्मचाºयांच्या वारसा नेमणुकीसाठी नेमलेल्या लाड-पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याकामी चालढकल केली जात आहे. पदोन्नती, अनुकंपा, वारसा नियुक्ती रखडली आहे. निवृत्तीनंतरच्या देय रकमा थकविल्या आहेत. सफाई कर्मचारी ‘ त्यांचे पुनर्वसन कायदा २०१३ चे सर्रास उल्लंघन केले जात आहे. २५० हून अधिक कर्मचाºयांना मोफत घरकुलांपासून वंचित ठेवले आहे.३शासन धोरणाच्या अनुषंगाने सफाई कामगारांचा दरमहा १ तारखेला पगार होणे अपेक्षित असताना वेळेवर पगार दिला जात नाही. घाण भत्ता, गणवेश शिलाई भत्ता देण्याकामी चालढकल केली जात आहे. याबाबतच्या सुमारे १४० हून अधिक तक्रारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केल्या. दहा महिने पाठपुरावा करुनही आयुक्तांनी दाद दिली नाही. या तक्रारींची दखल घेत राज्य सफाई कर्मचारी आयोगाने लेखी पत्र आयुक्तांना पाठविल्याचे अ‍ॅड. सागर चरण यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड