शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लू नोव्हेंबरमध्ये झाला थंड, नागरिकांचा सुटकेचा नि:श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 01:06 IST

नागरिकांचा सुटकेचा नि:श्वास : बदलत्या हवामानामुळे महिनाभरात नाही एकही रुग्ण

पिंपरी : जुलै महिन्यामध्ये अचानक डोके वर काढलेल्या स्वाइन फ्लूने चार महिने अक्षरश: थैमान घातले होते. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत ३३ रुग्णांचा या आजाराने बळी घेतला आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे महिनाभरामध्ये स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळला नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे आरोग्य विभागासह शहरातील नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

पावसाळ्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ होऊ लागली. त्याचप्रमाणे मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे शहरवासीयांमध्ये स्वाइन फ्लूची दहशत होती. महिन्याभरापूर्वी कधी पाऊस, तर कधी कडक ऊन या वातावरणामुळे विषाणंूना पोषक वातावरण होते. मात्र आता बदललेल्या वातावरणाचे अनुकूल परिणाम दिसू लागले आहेत. १७ आॅक्टोबरपासून स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळला नाही. आॅगस्ट संपूर्ण व आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सर्वाधिक रुग्ण आढळले होते. जानेवारी महिन्यापासून २४३ रुग्णांना या जीवघेण्या आजाराची लागण झाली होती. मात्र, महिनाभरापासून एकाही रुग्णाला लागण झाली नाही. तसेच यापूर्वी लागण झालेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.विषाणूंसाठी प्रतिकूल वातावरण

स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या मर्यादित, मात्र मृत्यूचे प्रमाण अधिक; तर डेंगीच्या रुग्णांची संख्या जास्त, त्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण नगण्य होते. शहरातील विविध खासगी व महापालिका रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण उपचार घेत होते. हवामानात अनुकूल बदल झाल्यामुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूंना प्रतिकूल वातावरण तयार झाले आहे. परिणामी मागील एक महिन्यामध्ये एकही रुग्ण आढळला नाही. स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येमध्ये घट झाल्याने नागरिकांसह आरोग्य विभागानेही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

आरोग्य विभागाची जनजागृती मोहीम सुरूशहरातील स्वाइन फ्लूच्या वाढत्या रुग्णांमुळे प्रशासनाला सातत्याने रोषाला सामोरे जावे लागत होते. दिवसेंदिवस रुग्णसंख्या व मृतांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य विभागाला चांगलेच धारेवर धरण्यात आले होते. स्वाइन फ्लूपासून संरक्षणासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली होती. शहरामध्ये रिक्षांवर स्पीकर लावून स्वाइन फ्लूविषयी जनजागृती करण्यात येत आहे.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड