शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 22:09 IST

साक्षीदारांसोबत बाचाबाची करून त्यांना धमकी देण्याचा प्रकार करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका....

पिंपरी : भावाच्या विरोधात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल होत असताना जमावाला भडकावले. याप्रकरणी विभागीय चौकशीची सुनावणी सुरू असताना सरकारी साक्षीदारासोबत बाचाबाची केली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. प्रणिल मारुती चौगले, असे निलंबित केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. चौगले हे वाकड पोलीस ठाण्यात नेमणुकीस असताना ४ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांच्या भावाच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येत होता. त्यावेळी वरिष्ठांची पूर्व परवानगी न घेता चौगले हे भुदरगड पोलीस ठाण्यात गेले. तेथील पोलीस कर्मचाऱ्यांशी त्यांनी हुज्जत घातली. त्यावेळी पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. भुदरगड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी जमावाला शांत करीत होते. त्यावेळी चौगले यांनी जमावाला भडकावले. त्यामुळे तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी चौगले यांच्याकडील पिस्तूल जमा करून घेतले. 

दरम्यान, चौगले यांची वाकड पोलीस ठाण्यातून बदली करण्यात येऊन सामाजिक सुरक्षा पथकात नेमणूक करण्यात आली. भुदरगड पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी चौगले यांची विभागीय चौकशी करण्यात आली. त्याची सुनावणी सुरू असताना चौकशीतील सरकारी साक्षीदारांसोबत चौगले यांनी बाचाबाची करून त्यांना धमकी देण्याचा प्रकार करून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, असा ठपका ठेवत चौगले यांना निलंबित करण्यात आले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsuspensionनिलंबनPoliceपोलिस