शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव गोळीबार प्रकरणातील संशयितांची पोलिसांनी काढली धिंड

By नारायण बडगुजर | Updated: June 24, 2024 23:49 IST

चिक्या शिंदे याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून 'आम्ही इथले भाई आहोत आमच्या नादाला कोणी लागायचे नाही' असे मोठमोठ्याने बोलून शिवीगाळ करत तळेगाव दाभाडे शहरातील काही ठिकाणी गोळीबार केला.

नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : तळेगाव दाभाडे शहरात अंदाधुंद गोळीबार करत दहशत निर्माण करणाऱ्या तिघांसह सहा जणांच्या टोळक्याची तळेगांव पोलिसांनी सोमवारी (दि. २४) तळेगाव परिसरातून धिंड काढली.       रोहन उर्फ चिक्या उत्तम शिंदे (१८, रा. कातवी रोड, तळेगाव स्टेशन), नीरज उर्फ दाद्या बाबू पवार (१९, रा. नेहरूनगर, पिंपरी), आदित्य नितीन भोईनल्लू (२१, रा. कामाठीपुरा, ता. शिरूर), विकी खराडे आणि अन्य दोघांना अटक केली.      चिक्या शिंदे याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून 'आम्ही इथले भाई आहोत आमच्या नादाला कोणी लागायचे नाही' असे मोठमोठ्याने बोलून शिवीगाळ करत तळेगाव दाभाडे शहरातील गजानन चौक, शाळा चौक, राजेंद्र चौक, मारुती मंदिर चौक अशा ठिकाणी गोळीबार केला. संशयितानी शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर सर्व संशयित पसार झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मोठा पोलिस फौजफाटा तळेगाव शहरात दाखल झाला. गोळीबाराचा थरार रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.       या गुन्ह्याचा समांतर तपास करत पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने मुख्य संशयित रोहन शिंदे, नीरज पवार, आदित्य भोईनल्लू यांना नाशिक येथून ताब्यात घेतले. तर इतर तिघांना तळेगाव पोलिसांनी अटक केली. संशयिताना वडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

पोलिस कोठडीत असताना संशयितांकडे तपास करत पोलिसांनी तीन गावठी पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे जप्त केली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी सर्व संशयितांची तळेगाव परिसरातून धिंड काढली. ज्या परिसरात गोळीबार करत संशयितांनी दहशत निर्माण केली होती, तिथे बेड्या ठोकून त्यांना फिरवण्यात आले.संशयितांना अटक केल्यानंतर त्यांनी ज्या भागात गोळीबार केला, त्या भागात पाहणी करण्यासाठी त्यांना नेण्यात आले होते. संशयितांचा दहशत माजवण्याबरोबर आणखी काही उद्देश आहे का याचा तपास सुरू आहे. - देविदास घेवारे, सहायक पोलिस आयुक्त

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी