शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव मावळ येथे आदिवासी विद्यार्थ्याची गळफास घेत केली आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 16:58 IST

आदिवासी विद्यार्थ्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती..

वडगाव मावळ : आंदर मावळातील वडेश्वर येथील डोंगरावर असलेल्या सटवाईवाडीत एक आदिवासी विद्यार्थ्याने मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली. संदिप एकनाथ हेमाडे (वय १३ रा.सटवाई वाडी ) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. आत्महत्याचे कारण समजु शकले नाही. वडगाव पोलीस ठाण्याचे हवलदार आर. बी. कर्डिले यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिप वडेश्वर येथील आश्रम शाळेत शिकत होतो. त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. मंगळवारी सकाळी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आदिवासी समाजातील एकनाथ हेमाडे यांचा एकुलता एक मुलगा संदिप होता. त्यांच्या मुलीचे लग्न २४ तारखेला कान्हे येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात झाले होते.मुलाला शिकवून त्याला काहीतरी मोठे करायचे. ही जिद्द वडिलांनी बाळगून परिस्थिती बिकट असूनही दहावीपर्यत शिक्षण दिले . ..............    जिवंत आहे की मृत्यू पावला हे सांगु शकत नाही, तपासायची मशिन नाही  शवविच्छेदनसाठी मृतदेह कान्हे फाटा येथील शासकीय रूग्णालयात आणला. तेथील डॉक्टर म्हणाले, आमच्याकडे चेकिंग करायची मशिन नसल्याने व्यक्ती जिवंत आहे की मृत्यू पावला हे सांगता येणे कठीण आहे. यामुळे शासकीय रूग्णालयात एक तास मृतदेह घेऊन बसावे लागले. शेवटी रुग्णवाहिकामधून तो मृतदेह वडगाव पोलीस ठाण्यात आणला.पोलिसांनी शवविच्छेदनासाठी तळेगाव येथील शासकीय रूग्णालयात पाठवले.याठिकाणी आदिवासी समाजातील गुलाब गभाले, कुबाजी मोरमारे, प्रताप कोकाटे, अरूण चिमटे, बाळू हेमाडे यांनी माहिती दिली. 

याबाबत पोलिसांनी सांगितले, एखाद्याचा मृत्यू झाला तर कान्हे शासकीय रूग्णालय जवळ असल्याने त्याठिकाणी शवविच्छेदनासाठी आम्ही घेऊन जातो. परंतू, तेथे काहीतरी कारण सांगून शवविच्छेदन करण्यास नेहमी टाळाटाळ केली जाते, असा आरोप पोलिसांनी केला. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस