पिंपरी : एका विवाहित महिलेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. संगीता राजेश सिंग असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकाराम नगर येथील साई मंदिराच्या पाठीमागे असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून संगीता यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. संगीता यांचे वडिल राम नरेश प्रसाद यांनी या आत्महत्येसाठी संगीता यांच्या सासरच्या मंडळींना जबाबदार धरले आहे. सासरच्या मंडळींकडून संगीताला नेहमी त्रास दिला जात असे. अनेकदा तिला मारहाणही केली जात होती, छळाला कंटाळून संगीताने आत्महत्या केली असावी, असा तिच्या माहेरच्या लोकांनी आरोप केला आहे संगीता आणि राजेश यांचा विवाह १० वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. सध्या पिंपरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पिंपरीतील संत तुकारामनगरात विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 17:01 IST
विवाहित महिलेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. संगीता राजेश सिंग असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
पिंपरीतील संत तुकारामनगरात विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या
ठळक मुद्देसंगीता यांचे वडिल राम नरेश प्रसाद यांनी संगीता यांच्या सासरच्या मंडळींना धरले जबाबदारसासरच्या मंडळींकडून संगीताला नेहमी त्रास दिला जात असे, मारहाणही केली जात होती.