छळाला कंटाळून युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:20 PM2017-10-01T23:20:46+5:302017-10-02T00:10:30+5:30

इगतपुरी तालुक्यातील वांजोळे येथील एका युवकाने गावातील काही संशयित व्यक्तींकडून होणारा शारीरिक व मानसिक छळ असह्य झाल्याने, सर्व गावकºयांसमक्ष चौकात येऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली.

Teenage teenage suicide due to persecution | छळाला कंटाळून युवकाची आत्महत्या

छळाला कंटाळून युवकाची आत्महत्या

googlenewsNext

घोटी : इगतपुरी तालुक्यातील वांजोळे येथील एका युवकाने गावातील काही संशयित व्यक्तींकडून होणारा शारीरिक व मानसिक छळ असह्य झाल्याने, सर्व गावकºयांसमक्ष चौकात येऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. दरम्यान, शारीरिक आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणाºया सर्व संशयितांना अटक करावी, अशी मागणी करीत नातलगांनी जोपर्यंत सर्व संशयितांना अटक केलीं जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा आणि अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर नातलगांनी मृतदेहावर आज दुपारनंतर अंत्यसंस्कार केले.
दरम्यान, याबाबत विजय पालवे यांच्या नातलगांनी दिलेल्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल केला होता. यांपैकी नऊ जणांना पोलिसांनी तत्काळ अटक केली. मात्र उर्वरित दोन फरार संशयितांना अटक करावी अशी मागणी मृतांच्या नातलगांनी लावून धरीत, जोपर्यंत फरार दोघाना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंत्यसंस्कार करणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत पोलीस ठाण्यासमोर चार तास ठिय्या मांडला. अखेर घोटी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी संतप्त नातलगांची समजूत घालीत मध्यस्थी करीत मृतदेह नातलगांच्या ताब्यात देऊन पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी वांजोळे गावात कमांडो पथकासह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबाबत घोटी पोलिसांनी दत्तू रामभाऊ बलय्या, कल्पना दत्तू बलय्या, संदीप दत्तू बलय्या, काळू रामभाऊ बलय्या, शोभा काळू बलय्या, सागर काळू बलय्या, चेतन काळू बलय्या, राहुल काळू बलय्या, वाळू रामभाऊ बलय्या, शारदा सुनील बलय्या व ताई वाळू बलय्या या संशयितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, यातील काळू व सागर हे बापलेक फरार आहेत. दरम्यान, या दोन्ही फरार संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी स्थानिक गुन्हा शाखेची मदत घेतली आहे. असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मिलिंद नविगरे, संदीप शिंदे आदी करीत आहेत.

Web Title: Teenage teenage suicide due to persecution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.