शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पदमजी पेपर मिलजवळ चेंबरला लागली अचानक आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 02:18 IST

थेरगाव : तरुणांच्या तत्परतेने अनर्थ टळला

थेरगाव : दत्तनगर येथील पदमजी पेपर मिलजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या भूमिगत चेंबरला गुरुवारी रात्री आठच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे काही वेळ परिसर धूरमय झाला होता. त्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.मिलच्या बाजूने डांगे चौक ते बिर्ला हॉस्पिटलपर्यंत रस्त्याच्या कडेला केबल टाकण्यासाठी चेंबर बांधण्यात आलेले आहेत. ते सिमेंटचे ब्लॉक टाकून झाकण्यात आलेले आहेत. गुरुवारी रात्री अचानक सिमेंटच्या ब्लॉकमध्ये असलेल्या फटींमधून आगीच्या ज्वाला बाहेर येऊ लागल्या व परिसरात धूर पसरला.

आग लागल्याचे समजताच लवकुश मित्र मंडळाचे संचालक जयपाल गायकवाड घटनास्थळी पोहोचले. सोबत थेरगाव फाउंडेशनचे सदस्य अनिल घोडेकर, युवराज पाटील व अनिकेत प्रभू यांनीदेखील धाव घेतली. त्यांनी त्वरित अग्निशामक दलाला याची माहिती कळवली. अग्निशामक दलाची गाडी येईपर्यंत लवकुश मित्र मंडळ, बजरंग दल व पदमजी पेपर मिलच्या सुरक्षारक्षकांनी आगीवर माती टाकून ती विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशामकच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. चेंबरवर पदमजी पेपर मिलमधील कर्मचारी आपल्या दुचाकी र्पाकिंग करीत असतात. तसेच कागदाने भरलेले ट्रक या ठिकाणी उभे केले जातात. आग पसरली असती, तर मोठा अनर्थ घडला असता. थेरगावमधील तरुणांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. अद्याप आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. 

टॅग्स :fireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल