शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
5
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
6
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
7
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
8
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
9
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
10
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
11
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
12
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
13
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
14
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
16
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
17
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
18
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
19
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
20
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी

खोटी कागदपत्रे न्यायालयात सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 02:21 IST

पोलीस घेताहेत कसून शोध : अ‍ॅड. सागर सूर्यवंशींना कधीही अटक होण्याची शक्यता

पुणे : रोझरी एज्युकेशनचे संचालक विनय अरान्हा यांची बनावट सही करून खोटे प्रतिज्ञापत्र तयार केल्याप्रकरणी मुख्य आरोपी अ‍ॅड. सागर सूर्यवंशी यांना शिवाजीनगर पोलिसांनी फरार घोषित केले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

अ‍ॅड. सूर्यवंशी यांच्यासह शीतल किशननंद तेजवानी यादेखील फरार आहेत. तर, नोटरी अ‍ॅड़ निवृत्ती मुक्ताजी यांची ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. तर अ‍ॅड. प्रियंका दिलीप शेलार (३४, रा. अगरवाल बिल्डींग, नाणेकरचाळ, रेल्वे स्टेशन रोड, पिंपरी) यांना यापूर्वी अटक केली आहे. २०१६ साली हा सर्व प्रकार घडला होता. दरम्यान, हा फरार असलेले अ‍ॅड. सूर्यवंशी खुलेआम विविध कार्यक्रमांना भेट देत आहेत. त्यामुळे त्यांना त्वरित अटक करून कारवाई करावी, अशी मागणी फिर्यादी विनय विवेक आरान्हा (वय ४४, रा. नेपियर रोड, पुणे) यांनी केली आहे. अ‍ॅड. सूर्यवंशी यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात केवळ अर्जकेला आहे. त्याचा शोध सुरू असून तो सापडल्यास त्याला त्वरित अटक करणार आहे, अशी माहिती तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अप्पासाहेब वाघमळे यांनी दिली. अ‍ॅड. सूर्यवंशी व त्यांची पत्नी शीतल तेजवानी यांनी रोझरी एज्युकेशन ग्रुपचे विरुद्ध स्पेसिफिक परफॉर्मन्सचे दाखल दाव्यात सूर्यवंशी यांनी अ‍ॅड. शेलार यांच्या मदतीने आरान्हा यांचे खोटे वकीलपत्र व प्रतिज्ञापत्र तयार केले. त्यावर आरान्हा यांची खोटी सही करून नोटरी नोंद करून त्यांची फसवणूक केली. एकतर्फी आदेश मिळविण्याच्या उद्देशाने न्यायालयाची दिशाभूल केली, अशी फिर्याद आरान्हा यांनी दिली आहे.खोट्या सामंजस्य कराराच्या आधारे जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात अ‍ॅड. सूर्यवंशी, अ‍ॅड. शर्मिला पी. गायकवाड, शाहबाज अजिज शेख (दोघेही रा. हरमेज हेरीटेज फेज -२, शास्त्रीनगर) आणि सैयदनेफुल्ला हुसेनी (रा. एचएन ८-१, वृंदाकॉलनी तोली चौक, हैदराबाद) यांच्या विरोधात दोषारोपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी केविन अँथोनी पिंटो (वय ५३, रा. सुखवस्तू, अर्चना हिल टाऊन, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी पिंटो व त्यांच्या आई पलॉरेन्स पिंटो यांनी त्यांची लोहगाव येथे असलेली २८.१६ हेक्टरजमीन जून १९८०मध्ये हरीश मिलानी यांना डीड आॅफ कन्फर्मेेशनद्वारे विकली होती.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCourtन्यायालय