शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता लागू होताच राजकीय फ्लेक्स काढण्यास सुरूवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 20:02 IST

आचार संहिता जारी झाल्यानंतर चोवीस तासांच्या आत फ्लेक्स काढून घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिल्यानंतर शहरातील राजकीय फलक काढण्यासाठी प्रयत्न केले जात होते.

ठळक मुद्देमहापालिकेच्या संकेतस्थळावरील छायाचित्रे गायब

पिंपरी : लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जारी होताच महापालिका परिसरातील फ्लेक्स काढण्यास सुरूवात झाली आहे. जाहिरात संस्थांची बैठक घेऊन फ्लेक्स काढण्याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सूचना केल्या आहेत. महापालिकेतील आचारसंहिता कक्षाच्या वतीने कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार परवाना विभागाच्या वतीने फ्लेक्सवर कारवाई केली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता रविवारी जारी केल्यानंतर शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या पहिल्या दिवशी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आचारसंहिता कक्ष कार्यान्वित केला आहे. तसेच महापालिका आयुक्तांनी चौथ्या मजल्यावरील दालनात आज बैठक घेतली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, परवाना विभागाचे सहायक आयुक्त विजय खोराटे यांच्यासह शहरातील जाहिरात संस्थांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी आचारसंहिता कालखंडात काय करावे, किंवा काय करू नये, अशी माहिती दिली. राजकीय फलक झाकलेदरम्यान नगरसचिव कार्यालयाच्या वतीने महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सत्तारूढ पक्षनेते, विविध समितींचे सभापती यांच्या कार्यालयातील राजकीय नेत्यांची छायाचित्रे कागदाने झाकली आहेत. तसेच काही पदाधिकाऱ्यांचे छायाचित्रे काढून टाकली आहे. तसेच पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे कागदाने झाकली आहेत. तसेच महापालिकेतील चौदा पदाधिकाऱ्यांची वाहने जमा केली आहेत, अशी माहिती नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.आचार संहिता जारी झाल्यानंतर चोवीस तासांच्या आत फ्लेक्स काढून घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिल्यानंतर शहरातील राजकीय फलक काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात होते. तसेच राजकीय लोकांच्या वतीनेही शहरातील बहुतांश फ्लेक्स काढून घेण्याचे काम सुरू होते.   ....................महापालिकेच्या संकेतस्थळावरील छायाचित्रे गायबमहापालिकेच्या संकेतस्थळावर महापौर राहूल जाधव, विविध पदाधिकारी यांची छायाचित्रे आहेत. राजकीय नेत्यांची छायाचित्रे काढून टाकण्याच्या सूचना आयुक्तांनी संगणक विभागाला केल्या होत्या त्यानुसार छायाचित्र काढून टाकली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliticsराजकारणElectionनिवडणूक