पिंपरी : पुणे पोलीस आयुक्तालयाचे विभाजन करून पिंपरी-चिंचवडसाठी नव्याने पोलीस आयुक्तालय करण्यासाठी हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. यासाठी सुधारित प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना राज्य शासनाने पुणे पोलिसांना दिल्या आहेत. त्याप्रमाणे सर्व त्रुटी दूर करून प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी- चिंचवडसाठी दुसऱ्या पोलीस आयुक्तालयाची मागणी आहे. पुणे ग्रामीण विभागातील काही भागही या आयुक्तालयाला जोडणे शक्य आहे. त्याचबरोबरपुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. लोकसंख्येमध्ये होणारी वाढ आणि पोलिसांचे मनुष्यबळ याचे गुणोत्तर जुळत नाही. गेल्या काही वर्षात गुन्हेगारीत झालेली वाढ आणि सायबर व आर्थिक गुन्हेगारीचे वाढते प्रमाण ही पोलिसांसमोरची आव्हाने आहेत. यासोबतच दहशतवाद आणि नक्षलवादी कारवाया शहरात सुरू आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसह जिल्ह्याचा काही भाग आयुक्तालयामध्ये येतो. सध्या पुणे आयुक्तालयामध्ये ४० पोलीस ठाणी कार्यरत आहेत. यासोबतच गुन्हे शाखा, विशेष शाखा, वाहतूक शाखा, एफआरओ या महत्त्वाच्या शाखा पुण्यातच आहेत. त्यामुळे पिंपरीवासीयांना त्यांच्या कामासाठी पुण्यात यावे लागते. पिंपरी चिंचवडचे नागरिक तसेच लोकप्रतिनिधींचीही वेगळ्या पोलीस आयुक्तालयाची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांसह जिल्ह्याचा काही भाग आयुक्तालयामध्ये येतो. सध्या पुणे आयुक्तालयामध्ये ४० पोलीस ठाणी कार्यरत आहेत. यासोबतच गुन्हे शाखा, विशेष शाखा, वाहतूक शाखा, एफआरओ या महत्वाच्या शाखा पुण्यातच आहेत. त्यामुळे पिंपरी वासियांना त्यांच्या कामासाठी पुण्यात यावे लागते. गेल्या वर्षी दुसऱ्या आयुक्तालयासाठी सर्व पक्षीय आमदार, खासदार यांनी प्रस्ताव दिला होता. त्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त के के पाठक यांनी बैठक बोलावली होती. मात्र ही बैठक होऊ शकली नव्हती.दरम्यान पिंपरी-चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय असावे यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला होता. (प्रतिनिधी)आयुक्तालयावरचा वाढता ताण लक्षात घेता आयुक्तालयाचे विभाजन करण्याचा विचार शासन स्तरावर सुरु आहे. शासनाने पुणे पोलिसांना पत्र पाठवत सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार यापूर्वीच्या प्रस्तावातील त्रुटी दूर करून नव्याने प्रस्ताव सादर केला जाणार आहे. जिल्ह्यातील कोणकोणते भाग नव्या आयुक्तालयात घ्यायचे, पोलीस ठाण्याची हद्द आणि नव्याने रचना यासंबधी त्यामध्ये नव्याने मुद्दे समाविष्ट केले जाणार आहेत.
आयुक्तालयासाठी हालचाली सुरू
By admin | Updated: April 17, 2016 02:56 IST