शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड पालिकेतील स्थायीच्या सभेत ऐनवेळचे प्रस्ताव मंजूर करण्याची परंपरा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 14:23 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभेत ऐनवेळेसचे प्रस्ताव मंजूर करण्याची परंपरा सुरूच आहे. सल्लागार नियुक्तीचे चार ऐनवेळसचे प्रस्ताव आज (शुक्रवार, दि. १५) मंजूर करण्यात आले. 

ठळक मुद्देस्थायीत सर्वाधिक सव्वाचारशे कोटींची विविध विकासकामे मंजूर, त्यात काही ऐनवेळचे विषयसल्लागार नियुक्तीचे चार ऐनवेळसचे प्रस्ताव आज (शुक्रवार, दि. १५) करण्यात आले मंजूर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभेत ऐनवेळेसचे प्रस्ताव मंजूर करण्याची परंपरा सुरूच आहे. सल्लागार नियुक्तीचे चार ऐनवेळसचे प्रस्ताव आज (शुक्रवार, दि. १५) मंजूर करण्यात आले. स्थायी समितीच्या सभेत ऐनवेळी प्रस्ताव मंजूर करण्याची परंपरा सुरूच आहे. स्थायी समितीत सर्वाधिक सव्वाचारशे कोटींची विविध विकासकामे मंजूर करण्यात आली. त्यात काही ऐनवेळेसचे विषयही होते. त्यात सल्लागारांचे ऐनवळेसचे विषय समितीने मंजूर केले आहेत. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या विकास योजना हद्दीतील सीडी वर्क पासून ते वाल्हेकरवाडी चौकापर्यंत ३४.५० मीटर रस्ता विकास करण्याच्या कामासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच सुदर्शननगर चौक येथे एफओबी बांधणे तसेच तळवडे जकात नाका ते देहूगाव कमान या रस्त्याचे उर्वरित काम करण्यात येणार आहे. त्यासाठी व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीचा विषय मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या विकास आराखड्यातील मोशी येथे स्टेडीयमचे आरक्षण आहे. ते विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदापूर्व आणि व्यवस्थापन तज्ज्ञ नेमण्यात येणार आहे. त्यासाठीच्या ऐनवेळसच्या विषयास मंजूरी देण्यात आली. पिंपळे सौदागर मधील आरक्षण क्रमांक ३६२ येथे खेळाच्या मैदानाचे आरक्षण आहे. ते विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्तीचा विषय मंजूर करण्यात आला. 

पाण्याबाबत सत्ताधारी-विरोधक समाधानीशहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण झाले होते. लवकर पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास हंडामोर्चा काढू? असा इशारा विरोधी पक्षातील सदस्यांनी दिला होता. पाणीपुरवठा विभागातील कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आजच्या सभेत विरोधकांनी पाण्यावर बोलायचे आहे, असे म्हटल्यावर सत्ताधाऱ्यांचे कान टवकारले. शरद मिसाळ, वैशाली काळभोर, मोरेश्वर भोंडवे, अमित गावडे यांनी ह्यगेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा सुरूळीत झाल्याचे सांगितले. तसेच पाणीपुरवठा विभागाचे अभिनंदन केले. अशीच परिस्थिती यापुढेही कायम रहावी, याची दक्षता पाणीपुरवठा विभागाने घ्यावी, अशी मागणी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणी