शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

उसतोड मजुराला डांबून ठेवून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 16:12 IST

उचल घेऊन कामावर न आल्याचे कारण पुढे करत उसताेड मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना वाकड येथे घडली.

पिंपरी : उचल घेऊनही कामावर न आल्याने उसतोड मजुराला डांबून ठेवले. तसेच शिवीगाळ करून मारहाण केली. दि. १९ ते २७ सप्टेंबर दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी माहिती दिल्यानुसार, याप्रकरणी कुमार बसप्पा कांबळे (वय ३२, रा. कस्पटे वस्ती, वाकड, मुळगाव उमराणी, ता. जत, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मयाप्पा गोफणे, नवनाथ सिद्धू गोफणे, ओघ्याप्पा गोफणे, शिवा माने, गुडा माने, बापू भिसे, दत्तात्रय देवमणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कांबळे उसतोड मजूर आहेत. त्यांनी उसतोडणीसाठी काही रक्कम उचल म्हणून घेतली होती. त्यानंतर ते वाकड येथे आले. मुकादम असलेला आरोपी याने आपल्या साथीदारांसह वाकड येथे येऊन बेकायदेशीर जमाव केला. तसेच फिर्यादी कांबळे यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी कांबळे यांना व त्यांच्या पत्नी, मुलाबाळांना तसेच जोडीदार नानाप्पा सुखदेव सोवळसंग याला गाडीमध्ये बसवून कर्नाटक येथील त्यांच्या मूळगावी घेऊन गेले. तेथे एका बंद खोलीत डांबून मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी कांबळे व त्यांच्या जोडीदाराला तेथून गाडीने कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील रायबाग येथे घेऊन गेले. तेथे एका स्टॅम्प पेपरवर ५० हजार रुपयांऐवजी एक लाख ८० हजार रुपयांची उचल फिर्यादी कांबळे यांनी घेतल्याचे आरोपींनी लिहून घेतले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडwakadवाकडPoliceपोलिस