झोपडपट्टी पुनर्वसन : लाभार्थींना आजअखेर मुदत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 03:39 AM2017-12-31T03:39:36+5:302017-12-31T03:39:43+5:30

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत पात्र झालेल्या चिंचवडमधील वेताळनगरातील नागरिकांनी पैसे भरण्यासाठीची अंतिम नोटीस पालिकेने परिसरात लावली आहे. या माध्यमातून पात्र उमेदवारांना ३१ डिसेंबरपर्यंत पैसे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र या बाबत पात्र उमेदवार कोणत्याही हालचाली करत नसल्याने पालिका प्रशासन काय भूमिका घेणार ही चर्चा परिसरात सुरू आहे.

 Slum rehabilitation: the deadline for beneficiaries today | झोपडपट्टी पुनर्वसन : लाभार्थींना आजअखेर मुदत  

झोपडपट्टी पुनर्वसन : लाभार्थींना आजअखेर मुदत  

googlenewsNext

चिंचवड : झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत पात्र झालेल्या चिंचवडमधील वेताळनगरातील नागरिकांनी पैसे भरण्यासाठीची अंतिम नोटीस पालिकेने परिसरात लावली आहे. या माध्यमातून पात्र उमेदवारांना ३१ डिसेंबरपर्यंत पैसे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र या बाबत पात्र उमेदवार कोणत्याही हालचाली करत नसल्याने पालिका प्रशासन काय भूमिका घेणार ही चर्चा परिसरात सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील घोषित झोपडपट्टीच्या पात्र लाभार्थ्याचे पुनर्वसन प्रकल्पामध्ये लाभ देण्याचे कामकाज सुरू आहे. सदर योजना जेएनएनयुआरएम योजने अंतर्गत राज्य शासन, महापालिका व लाभार्थी झोपडपट्टी धारक यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.
सदर योजनेत चिंचवडमधील वेताळनगर पुनर्वसन प्रकल्पात बांधण्यात आलेल्या ए २ व ए ७ अशा दोन इमारती मधील २२४ सदनिकांचे वाटप करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. प्रत्येक इमारतीमध्ये ११२ पैकी १११ पात्र लाभार्थी व १ अंगणवाडीसाठी सदनिका राखीव आहे. पात्र झोपडपट्टी धारकांनी आपल्या हिश्याची रक्कम अद्याप भरलेली नसल्याने अडचणी येत आहेत. या साठी मागासवर्गीय लाभार्थ्यांना १०% म्हणजेच ४२ हजार ५७० रुपये, खुल्या वर्गातील लाभार्थ्यांना १२% म्हणजेच ५० हजार ५७५ रुपये या प्रमाणे पिंपरीतील बँक आॅफ बडोदा या ठिकाणी भरावयाचे असून, याच्या पावतीची छायांकित प्रत कार्यालयात सादर करावयाची आहे. यासाठी पालिकेने वेताळनगर परिसरात फलक लावून नागरिकांना जाहीर नोटीस दिली आहे. जे लाभार्थी ३१ डिसेंबरपर्यंत पैसे भरणार नाहीत, अशा लाभार्थ्यांना कायम स्वरुपी अपात्र ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भविष्यात कोणत्याही पुनर्वसन प्रकल्पात लाभ घेता येणार नसल्याचे यात नमूद केले आहे. अशा लाभार्थींचा धारणाधिकार संपुष्टात येईल अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारचा निर्णय झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने घेतला आहे.
केंद्रात, राज्यात, मनपात भाजपाची एकहाती सत्ता असताना २५% देखील पूर्ण झालेले नाही. परवानगीसाठी महावितरण, मनपा यांच्यात कोणताही समन्वय नसल्याचे आढळून येत आहे. रस्ते खोदाई, पोलीस परवाने अशा परवानग्या घेण्यासाठी एक एक वर्ष कालावधी लागत आहे. जनतेची कामे होत नसतील तर मग भाजपाची एकहाती सत्ता काय उपयोगाची? केंद्राकडून मिळणाºया निधीचा वेळेत विनियोग न केल्याने हा निधी परत जाण्याची शक्यता आहे.

पात्र, अपात्राचा विषय महत्त्वाचा
वेताळनगर झोपडपट्टीत अनेक वर्षांपासून राहणारे अनेक कुटुंब अपात्र झाले आहेत. यांच्याकडे पुरेसे पुरावे नसल्याने त्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. या बाबत असे रहिवासी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन झाल्यानंतर येथील जागेचा ताबा पालिका घेणार आहे. मात्र आम्ही स्थानिक रहिवासी असूनही आम्हाला अपात्र ठरविले जात असल्याच्या तक्रारी येथील रहिवासी करत आहेत. आम्हाला घर मिळत नाही तोपर्यंत आमच्या झोपड्यांना पालिकेला धक्काही लावून देणार नाही, असा पवित्रा अपात्र रहिवाशांनी घेतला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पालिका प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वेताळनगर येथील झोपडपट्टीत राहणारे सर्व कुटुंबे अतिशय गरीब व आर्थिकदृट्या कमकुवत असल्याने त्यांचा सहभाग असणारी रक्कम एकाच वेळी भरू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांचा जर झोपडीचा हक्क संपत असेल तर बेघर होऊन त्यांच्यावर दारोदार फिरण्याची वेळ येईल. यासाठी दहा हजार इतकी रक्कम भरून घेऊन लाभार्थ्यांच्या रकमेचे कर्ज प्रकरण महापालिकेने मंजूर करून घ्यावे, अशी मागणी दलित युवक आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन शहराध्यक्ष श्रावण बगाडे यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.

Web Title:  Slum rehabilitation: the deadline for beneficiaries today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.