शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
3
बारामतीत खेला होबे...? शरद पवारांना विजयाची खात्री, पण या गोष्टीची धाकधुकही
4
Shoaib Malik शी घटस्फोटानंतर Sania Mirza ने बदलली घरावरील 'नेम प्लेट'; स्वत:सोबत जोडले एका खास व्यक्तिचे नाव
5
तब्येत बरी नसतानाही IPL मॅचनंतर शाहरुखची 'ती' कृती जिंकतेय चाहत्यांचं मन; Video व्हायरल
6
Gold-Silver Price: रिटर्न देण्याच्या बाबतीत चांदीनं सोन्याला टाकलं मागे, पाहा किती झाली किंमत?
7
मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी
8
"मला iPhone घेण्याची ऐपत नाही..."; लेकीनं बापाला इतकं सुनावलं, रस्त्यावरच गुडघे टेकले
9
प्रज्वल रेवण्णांच्या अटकेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पीएम मोदींना पत्र लिहिलं; केली मोठी मागणी
10
षडयंत्र, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे...; बांग्लादेशी खासदाराच्या मृत्यूचं गूढ कायम
11
“केजरीवाल यांनी कठोर कारवाई करुन न्याय द्यावा”; निर्भयाच्या आईचे स्वाती मालिवाल यांना समर्थन
12
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला न विसरता करा पिंपळाची पूजा; जाणून घ्या कारण!
13
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
14
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
15
Success Story: वडील शेतकरी, आई चालवायची अंगणवाडी केंद्र; मुलानं उभं केलं ₹९७३ कोटींचं साम्राज्य
16
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
17
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या विचारातून परिस्थितीचा सामना करायला शिका!
18
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
19
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
20
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य

उद्योगनगरीत उपलब्ध होणार सहा हजार घरे - सतीशकुमार खडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 5:52 AM

पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील सर्वसामान्य, कष्टकरी कामगार वर्गाच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने वाल्हेकरवाडी, चिंचवड, तसेच भोसरी-मोशी सेक्टर १२ व सेक्टर ६ मध्ये गृहयोजना राबविण्यात येणार असून

पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील सर्वसामान्य, कष्टकरी कामगार वर्गाच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने वाल्हेकरवाडी, चिंचवड, तसेच भोसरी-मोशी सेक्टर १२ व सेक्टर ६ मध्ये गृहयोजना राबविण्यात येणार असून, सुमारे सहा हजार घरे उपलब्ध होणार आहेत. मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रामुळे आपली वेगळी ओळख निर्माण होण्यास मदत होणार आहे, असे मत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी सांगितले.खडके म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड परिसरात औद्योगिक विकासाला सुरुवात झाली. देश-विदेशातील अनेक उद्योगसमूहांनी या परिसरामध्ये आपले उद्योग सुरू केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कामगारवर्ग देशाच्या विविध भागातून शहरात राहू लागले. कामगार कष्टकरी वर्गाच्या निवाºयासाठी नियोजनबद्ध नवनगर उभे करणे आवश्यक होते. कामगारांना घरकुल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १४ मार्च १९७२ रोजी प्राधिकरणाची स्थापना झाली. प्रत्येक शहराच्या निर्मितीमागे काही विशिष्ट प्रयोजन असते. आदर्श नवनगर निर्मिती हा मानवाच्या आणि समाजाच्या प्रगत जीवनातील एक महत्त्वाचा भाग समजला जातो. हे नवनगर रचनात्मक भूमिकेतून उभे राहिले आहे. उत्तम पेठा तयार झाल्या. मोठे रस्ते, क्रीडांगणे, उद्याने, शैक्षणिक, वैद्यकीय, व्यापारी सुविधा उपलब्ध झाल्या. ‘नगरेची रचावी। जळाशये निर्मावी। महावने लावावी नानाविध।’ या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीमध्ये नवनगराचे महत्त्व उद्धृत केले आहे.’’‘‘नवनगरासाठी ४३२३ हेक्टर क्षेत्र नामनिर्देशित करण्यात आले. तसेच नियोजन आणि नियंत्रणाखाली १७३९ हेक्टर क्षेत्र, संपादनाखालील २५८४ हेक्टर क्षेत्र होते. निवाड्यानंतर निव्वळ संपादनाखाली राहिलेले क्षेत्र १८४० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी प्रत्यक्ष ताब्यात आलेले क्षेत्र १४७१ हेक्टर असून, विकसित क्षेत्र १३२५ हेक्टर क्षेत्र आहे. प्राधिकरणाने एकूण ४२ नियोजित पेठा आणि ४ व्यापारी केंद्र विकसित केले आहे. विकसित पेठा २४ आणि ३ व्यापारी केंद्रे आहेत. आतापर्यंत प्राधिकरणाने ३४ गृहयोजना राबविल्या असून, एकूण ११२२१ सदनिकांची निर्मिती केली आहे. वाणिज्य प्रयोजनाचे २३१ गाळे आहेत. एकूण विकसित केलेले भूखंड ६९७९ असून, व्यापारी व औद्योगिक वापरासाठी ७०५ भूखंड निर्माण केले आहेत. ट्रॅफिक पार्क, स्पाईन रस्त्यावरील टाटा मोटर्स येथील उड्डाणपूल, औंध-काळेवाडी रस्त्यावरील उड्डाणपूल, भक्ती-शक्ती समूह शिल्प, वाल्हेकरवाडी ते भोसरी स्पाईन रोड, भोसरी परिसरातील नाला ट्रेनिंग, नाला सुशोभीकरण, असे ठळक प्रकल्प प्राधिकरणाने विकसित केले आहेत. तसेच मोशी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या कामासही गती मिळाली.’’‘‘मध्यंतरीच्या कालखंडामध्ये घरकुल उभारण्याचे प्रकल्प काही काळ थंडावले होते. त्यास गती देण्याचे काम सुरू झाले आहे. वाल्हेकरवाडी-चिंचवड येथील प्रकल्पाला गती मिळाली आहे. या ठिकाणी अल्प, मध्यम उत्पन्न गटातील घटकांसाठी घरकुलाचे काम सुरू आहे. घरकुल उभारणीसाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे. तसेच सेक्टर १२मध्ये सुमारे ४९५० घरांचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच सेक्टर ६ मध्ये ९०० सदनिकांचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सर्वसामान्य कष्टकरीवर्गाचे घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्राधिकरणाच्या वतीने प्रयत्न सुरू असून, त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. आगामी कालखंडामध्ये सुमारे सहा हजार घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे, असेही खडके म्हणाले. पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी म्हणून परिचित असून, पुणे-नाशिक महामार्गावरील प्राधिकरणाच्या मोशी परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार असून, त्याचा विकास टप्प्याटप्प्याने करण्यात येणारआहे. हे कामही सुरू झाले आहे. पूर्वीच्या केंद्र आराखड्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार नवीन आराखडा तयार करून काम सुरू झाले आहे.आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राचा विकास पूर्ण झाल्यानंतर या केंद्रामुळे आपली वेगळी ओळख निर्माणहोणार आहे. पहिल्या टप्प्यातप्रदर्शन केंद्रासाठी आवश्यक त्या भौतिक सुविधांची निर्मिती केली जाणार आहे.’’

टॅग्स :Homeघर