शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

चिठ्ठीतून लागली सरपंचपदाची लॉटरी; ग्रामपंचायत बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 02:47 IST

निवडणुकीचा खर्च टाळण्यासाठी गावकऱ्यांचा स्तुत्य निर्णय

वडगाव मावळ : निवडणूक म्हटले की मतदान, त्यावर होणारा खर्च आणि त्यातून निर्माण होणारे कटू प्रसंग ओघाने येतात. ते टाळण्यासाठी अनेक गावांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. शिलाटणे गावामध्ये सदस्यांची निवड बिनविरोध झाली. पण सरपंचपदासाठी पाच जण इच्छुक उमेदवार होते. त्यांच्यात एकमत होत नव्हते. अखेर तहसील कार्यालयाच्या बाहेर पाच सदस्यांच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्या छोट्या मुलांला उचलण्यास सांगण्यात आले. या चिठ्ठीच्या माध्यमातून गुलाब अहिरे यांना सरपंचपदाची लॉटरी लागली.मावळ तालुक्यातील सात गावांत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस होता. उमेदवारांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. शिलाटणे आणि पुसाणे या गावांतील निवडणूक बिनविरोध झाली. शिलाटणेत सरपंचपदासाठी पाच उमेदवार होते. चिठ्ठी टाकून सरपंच निवड पद्धतीत गुलाब विठ्ठल अहिरे हे सरपंच बनले. बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांची नावे खालीलप्रमाणे : प्रभाग १ : कांचन शरद भानुसघरे, माधुरी रामनाथ भानुसघरे, मनीषा दत्तात्रय भानुसघरे. प्रभाग २ : शरद भीमराव अहिरे, सोनाली सुशिला येवले, निर्मला बाळासाहेब भानुसघरे. प्रभाग ३ :रूपाली दत्तात्रय कोंडभर, अश्विनी मच्छिंद्र भानुसघरे, जनाबाई विनायक कोंडभर अशी आहेत.मावळ तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अमाप खर्चकरण्यात येतो. पण पुसाणे आणि शिलाटणे गावाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून नवा आदर्श ठेवला आहे.

टॅग्स :sarpanchसरपंच