शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"लोककलावंतांना जपले पाहिजे..."; पिंपरीत चौघडावादक पाचंगे पिता-पुत्राचा सन्मान

By श्रीनिवास नागे | Updated: August 19, 2023 16:06 IST

ककलावंतांना जपले पाहिजे. पाचंगे पिता-पुत्र हे निरपेक्ष भावनेने चौघडावादन करतात...

पिंपरी : लोककलावंत हे फक्त महाराष्ट्राचे नाहीत तर भारताचे भूषण आहेत. लोककलावंतांना जपले पाहिजे. पाचंगे पिता-पुत्र हे निरपेक्ष भावनेने चौघडावादन करतात. त्यांच्या कार्यक्रमात बहुजन-अभिजन भेद गळून पडला, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी केले.

चौघडावादक दत्तोबा शंकर पाचंगे यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आणि त्यांचे पुत्र रमेश दत्तोबा पाचंगे यांचा एकसष्टीनिमित्त जाहीर नागरिक सत्कार व मानपत्र प्रदान कार्यक्रम पार पडला. यावेळी सबनीस बोलत होते. डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील यांच्या हस्ते पाचंगे पिता-पुत्राला सन्मानित करण्यात आले. आमदार रवींद्र धंगेकर, पिंपरी-चिंचवड मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, बालगंधर्व संगीत रसिक मंडळ अध्यक्षा अनुराधा राजहंस, माजी आयपीएस अधिकारी डॉ. विठ्ठलराव जाधव, कृष्णात महाराज, राघव चैतन्य महाराज आदींनी कार्यक्रमाला उपस्थित राहत पाचंगे पिता-पुत्राला शुभेच्छा दिल्या.

श्रीपाल सबनीस म्हणाले, दत्तोबा पाचंगे यांच्या चौघडा वादनाने अनेकांना मोहित केले. त्यांचा वारसा त्यांचा पुत्र रमेश याने समर्थपणे पुढे चालवला. या पिता-पुत्राने माणसांची कमाई केली. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाला अभिजन-बहुजन भेद गळून सर्व क्षेत्रातील मान्यवर येथे उपस्थित आहेत.

कांदे, बटाटे विक्री करत जपली कला-सबनीस म्हणाले, दत्तोबा पाचंगे यांनी चौघडा वादन करत होते. तेव्हा त्यातून संसाराचा गाडा हाकेल इतकेही पैसे मिळत नव्हते. त्यामुळे कांदे-बटाटे विक्री करून त्यांनी आपला उदरनिर्वाह करत आपली कला जपली. त्यांचा आदर्श त्यांचा मुलगा रमेश यांनी पुढे चालू ठेवला.

पाचंगे यांनी चौघडा वादनातून आपली एक समर्थ ओळख निर्माण केली आहे. ही मोठी मनाची माणसे आहेत. आपली कला सादर करताना त्या बदल्यात आपल्याला किती मानधन मिळणार याची विचारणा देखील त्यांनी केली आहे. त्यांना पद्मश्री मिळायला हवा. त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत.-डॉ. पी.डी. पाटील, कुलपती, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड