शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारी श्रावण सखी महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 01:36 IST

कलर्स, लोकमत सखी मंच व अनलिमिटेड द फॅमिली फॅशन स्टोअरचा उपक्रम

पिंपरी :

आलीस तू अशी ही, लेवून सांजधारामन मोरपीस झाले, होऊ नकोस वारातू थांब ना जराशी, उधळून पिसाराहे मेघ शुभ्र व्हावे, बरसून रंग धारा!!श्रावण आणि प्रेम म्हणजे इंद्रधनुषी रंगांत मोरपिसाचा स्पर्श व्हावा आणि प्रेमाला बहर यावा. त्याचं आणि तिचं नातं बहरून यावं, मोहरून यावं!आजकाल या नात्याला बहरून येण्यासाठी अधिक वेळ लागत नाही. इंटरनेट, सोशल मीडियाद्वारे प्रेम जरा जास्तच जवळ आलं आहे. फक्त प्रेमच नाही, तर इतरही गोष्टी सोप्या आणि सुटसुटीत झाल्या आहेत.पण गंमत अशी आहे, की या इंटरनेटच्या युगात प्रत्यक्ष भेटीवर आणि पारंपरिक पद्धतीने घडून आलेल्या योगायोगावर विश्वास ठेवणारासुद्धा एक तरुणवर्ग आहे. इंटरनेट आणि पारंपरिक प्रेम यातील गंमत व तफावत कलर्स चॅनलच्या आगामी मालिाकेमध्ये बघायला मिळणार आहे; ज्याचे नाव आहे ‘इंटरनेटवाला लव्ह.’याच आगळ्यावेगळ्या प्रेमाचा धागा घेऊन श्रावण महिन्यातला हा श्रावण सखी महोत्सव कलर्स व सखी मंच प्रस्तुत, अनलिमिटेड द फॅमिली फॅशन स्टोअरच्या, फुगेवाडी सहयोगाने सुबक आणि सुरेख पद्धतीने गुंफला आहे - ज्यात आहेत विविध स्पर्धा, खेळ, मनोरंजन आणि भरपूर काही.सखींसाठी खास फॅशन वॉकयामध्ये आधुनिक वेशभूषेसह तिला रॅम्पवर उतरायचे आहे आणि ‘इंटरनेटवाला लव्ह’वर तिचे मत मांडायचे आहे. ज्यामध्ये काही प्रश्नसुद्धा विचारले जातील.स्त्रियांची आवडती उखाणे स्पर्धाआणखी विशेष आकर्षण म्हणजे एक मिनिट गेम शोमध्ये पारंपरिक पद्धतीने खेळ खेळविले जातील. ज्यात फुगडी, लिंबू-चमचा असे खेळ असतील. विशेष कॉमेडी शोचे सुद्धा आयोजन केले जाईल. वंदन राम नगरकर स्टॅण्डअप कॉमेडी शो सादर करणार आहेत. एकूणच मनोरंजनाने भरगच्च असा हा कार्यक्रम राहणार आहे. ‘इंटरनेटवाला लव्ह’ हा पारंपरिक पद्धतीने घडून आलेला लग्नसोहळा यावर बरीच रंगतदार चर्चा या निमित्ताने होणार आहे. २७ आॅगस्टपासून संध्याकाळी ७ वाजता सोमवार ते शुक्रवार या दरम्यान ही मालिका प्रसारित होणार आहे. कार्यक्रम सर्व सखींसाठी नि:शुल्क असून, सहभागी होण्यासाठी ९०२८३६२५०९, ९८८१६७०१५४ या नंबरवर संपर्क साधावा. कार्यक्रमाचे व्हेन्यू स्पॉन्सरर ढोरे लॉन्स (अनुश्री हर्षल ढोरे) असून, वन मिनिट गेम शोचे गिफ्ट स्पॉन्सरर कावेडिया ज्वेलर्स (जुनी सांगवी) आहेत.४उखाणा स्पर्धेमध्ये एकच उखाणा सादर करावा.४स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रथम नावनोंदणी करणे आवश्यक.४फ्युजन फॅशन शोसाठी आधुनिक आणि पारंपरिक वेशभूषा करावी.उदा. छत्रीसह पैठणी, गॉगल, नऊवारी इ.४‘प्रेम’ या शब्दाचा वापर करून उखाणा घ्यावा.४उपस्थित सखींनी हिरवी साडी वा ड्रेस आणि नथ परिधान करावी.४आकर्षक वेशभूषेतील सखींना बक्षीस जिंकण्याची संधी.४या कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येक सखीस अनलिमिटेड द फॅमिली फॅशन स्टोअरतर्फे, फुगेवाडी हमखास गिफ्ट व्हाउचर देण्यात येईल.४अनलिमिटेड द फॅमिली फॅशन स्टोअरमधील नवनवीन वेशभूषेमध्ये सखींना रॅम्प वॉक करण्याची संधी मिळणार आहे.४लेटिस्ट अ‍ॅट्यूम विंटर २०१८ ची नवीन रेंज आपल्या सखीमंचच्या सहभागी सभासदांना अनुभवता येईल. ‘अनलिमिटेड’ हा ब्रँड पुरुष, स्त्रिया व लहान मुलांकरिता २०००० पेक्षा जास्त व्हरायटी सादर करत आहे. याचीच एक झलक म्हणून सखी मंच सभासद अनलिमिटेड द फॅमिली फॅशन स्टोअर (फुगेवाडी) वस्त्र परिधान करून फॅशन वॉक करताना पहायला मिळेल.कार्यक्रमाची वेळ : दुपारी १२स्थळ : बालाजी लॉन, ढोरेनगर, लेन नं. १, नदी किनारा, जुनी सांगवी

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड