शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव मावळमध्ये शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 11:45 IST

परिसरात वीज वाहिनीच्या शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत एका स्टेशनरी दुकानासह दोन कुटुंबाच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना बुधवार (दि. २४) पहाटे दीडच्या सुमारास वडगाव येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराजवळ घडली. 

ठळक मुद्देअजीज तांबोळी यांना जाग आल्याने वाचली जीवितहानीदुकानासह लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक

वडगाव मावळ  : परिसरात वीज वाहिनीच्या शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत एका स्टेशनरी दुकानासह दोन कुटुंबाच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना बुधवार (दि. २४) पहाटे दीडच्या सुमारास वडगाव येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराजवळ घडली. झोपेत असताना वीज वाहिनीच्या जळणाऱ्या धुराच्या उग्र वासाने अजीज तांबोळी यांना जाग आल्याने जीवितहानी वाचली. काही वेळातच भीषण आगीत उघड्या डोळ्यादेखत कष्टातून उभारलेले लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. घरातील गॅस  सिलेंडर वेळीच बाजूला केल्याने धोका टाळला. घराच्या बाजूला सिमेंटच्या भिंती असल्याने आग बाजूला पसरू शकली नाही.अनिस गुलाबभाई तांबोळी व अजीज गुलाबभाई तांबोळी या दोन भावांचे कुटूंब राहत होते. अजित तांबोळी यांचे स्टेशनरीचे दुकान होते. बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास वीज वाहिनीचे शॉटसर्किट होऊन अचानक आग लागली. या आगीत दुकान व घरातील सर्वच वस्तू जळून खाक झाल्या. तांबोळी कुटुंबीयांच्या आरडाओरड्याने परिसरातील बंटी वाघवले, महेंद्र भालेकर, राजू चव्हाण, मोईस गांधी, उमाकांत गाडे, मंगेश खैरे, सौरभ दुगम, अभिजित ढमाले, सचिन ओसवाल, रोहिदास म्हाळसकर, बाळासाहेब ढोरे, पंढरीनाथ भिलारे, सोमनाथ काळे आदींनी आग विजवली.विद्युत महावितरण अभियंता विजय जाधव म्हणाले, घटनास्थळाची पाहणी करुन त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठविला जाईल.

टॅग्स :mavalमावळpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड