शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:01 IST

परस्परविरोधी गुन्हे : वळसे पाटील यांच्या घरासमोर शिवसेना शाखेचे आढळराव यांच्या हस्ते उद्घाटन

मंचर : निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मागासवर्गीय तरुणांवर हल्ला केल्याने त्यांच्यावर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

मंचर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. अनुचित प्रकार घडू नये यासाठी निरगुडसर गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर गावात त्यांच्या निवासस्थानासमोरच शिवसेना शाखेचे आज उद्घाटन होणार होते. रात्रीतून त्यासाठी तयारी करण्यात आली. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन होऊन काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याच वेळी जमाव जमू लागला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांचे समर्थक शिरुर येथे नियोजित कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले. त्यानंतर उपस्थित असलेल्या वळसे पाटील समर्थक आणि आढळराव पाटील समर्थकांनी नेत्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. त्यांनतर समोरासमोर कार्यकर्ते भिडले. त्यामुळे एकमेकांत हाणामारी झाली. तीन तरुणांना मारहाण करण्यात आली. यामुळे वातावरण एकदम तणावग्रस्त झाले. या घटनेत काही मागासवर्गीय कार्यकर्त्यांनाही मारहाण झाल्याचे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे. निरगुडसर गावात झालेल्या दोन पक्षीय कार्यकर्त्यांमधील भांडणामुळे वातावरण नियंत्रणाखाली असून, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

निरगुडसर गावातील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. त्यांनी बाहेरगावाहून भाडोत्री गुंड आणून फूस लावून येथील दलित बांधवांमध्ये भांडण लावून, मारामारी करून देण्याचा अत्यंत खालच्या पातळीवरचा प्रकार घडवून आणला आहे. निरगुडसर ग्रामस्थांच्या वतीने त्याचा निषेध करतो. दोषींवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी.- दादाभाऊ टाव्हरे, उपसरपंच, निरगुडसरराष्ट्रवादीची दादागिरी निरगुडसर गावात सुरु असून प्लॅन करुन मागासवर्गीय तरुणांना जाणीवपूर्वक मारहाण करण्यात आली आहे. शूटिंगमध्ये सर्वकाही दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी करून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा केलेला प्रयत्न निंंदणीय आहे. गरिबांवर अन्याय झाला असून, दोषींवर पोलिसांनी कारवाई करावी. अन्यथा आम्ही पोलीस ठाण्यातून हलणार नाही. ठिय्या आंदोलन करू

- रवींद्र वळसे-पाटील, माजी उपसरपंच

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस