शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मतदानासाठी त्या बहारीनवरुन आल्या परंतु 'या' कारणाने करता आले नाही मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 18:50 IST

बहारीन येथूून आलेल्या रसिका जाेशी यांचे नाव यादीतून वगळण्यात आल्याने त्यांना मतदान न करताच मतदान केंद्रातून परतावे लागले.

पिंपरी : लाेकशाहीचा उत्सव सध्या सुरु असून देशभरात लाेकसभेसाठी मतदान सुरु आहे. आज राज्यातील चाैथ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडले. पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरुर या दाेन मतदार संघामध्ये आज मतदान पार पडले. पिंपरी चिंचवड हे मावळ मतदार संघामध्ये येते. परदेशी कामानिमित्त असणारे अनेक मतदार येथे आहेत. त्यातीलच रसिका जाेशी या बहारीन या देशातून निगडी येथे मतदानास आल्या. गेल्या लाेकसभेला त्यांनी मतदान केले हाेते. यंदा त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्याने त्यांना मतदान करता आले नाही. हजाराे किलाेमीटरचा प्रवास करुन आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आलेल्या जाेशी यांना मात्र निराश हाेऊनच मतदान केंद्रावरुन परतावे लागले.  जाेशी या निगडी येथील रहिवासी असून सध्या त्या बहारीन या देशामध्ये वास्तव्यास आहेत. त्यांचे पती बहारीनमध्ये नाेकरी करत असल्याने त्या तिकडेच राहतात. मागील लाेकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुकांना त्यांनी आवर्जुन येत मतदान केले हाेते. यंदा देखील त्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भारतात आल्या. निगडी येथील शिवभूमी विद्यालयात त्यांचे मतदान हाेते. गेल्या लाेकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांना त्यांनी तेथेच मतदान केले हाेते. यंदा मात्र त्यांचे नाव यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे त्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. 

लाेकमतशी बाेलताना जाेशी म्हणाल्या, मी खास मतदान करण्यासाठी बहारीन येथून निगडीला आले. गेल्या लाेकसभेला मी याच ठिकाणी मतदान केले हाेते. यंदा मात्र माझे नाव वगळण्यात आले. नाव वगळलेल्या, किंवा मयत नागरिक अशा कुठल्याच यादीमध्ये माझे नाव नव्हते. माझे नाव का वगळण्यात आले याचे कारण समजू शकले नाही. मी नाव वगळण्याचा किंवा पत्ता बदलण्याचा कुठलाही अर्ज केला नव्हता. मी निगडीत जेथे राहते त्या ठिकाणच्या इतर सर्वांचे नाव मतदार यादीत हाेते, केवळ माझेच नाव वगळण्यात आले. याबाबत मी प्रशासनाकडे दाद मागणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmaval-pcमावळElectionनिवडणूक