शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शास्ती कर माफीतील जाचक अटी दूर करू : देवेंद्र फडणवीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 17:16 IST

राज्य सरकारने शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. परंतु, त्यामध्ये त्रुटी आहेत. त्या स्वतंत्र बैठक घेऊन दूर करणार आहोत.

ठळक मुद्देअनधिकृत बांधकाम नियमितीकरणाचे शुल्क किती आकारावे हे पालिकेला ठरविण्याचा अधिकार माझ्यासाठी महाराष्ट्रातील बारा कोटी जनता विठ्ठल-रखुमाईसारखी

पिंपरी : राज्य सरकारने अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याचा आणि अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात काही त्रुटी असून त्या कमी करण्यात येतील. तसेच बांधकाम नियमितीकरणा संदर्भात दंड आणि जाचक अटी शिथील केल्या जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने चिंचवडगावात उभारण्यात येणा-या राष्ट्रीय स्मारकाच्या दुसऱ्या टप्याच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, खासदार श्रीरंग बारणे, भाजपा शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह सतीश गोरडे, रवी नामदे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, भाजपाचे नेते आझम पानसरे आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. परंतु, त्यामध्ये त्रुटी आहेत. नियमावलीतील अटी देखील जाचक असल्याच्या तक्रारी येत आहे.याबाबत लवकरच आपण स्वतंत्र बैठक घेऊन त्या दूर करणार आहोत. अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाचे शुल्क किती आकारावे हे पालिकेला ठरविण्याचा अधिकार दिला आहे. महापालिका ठरवेल तेवढे शुल्क आकारण्यात येईल. सर्वांचे घर अधिकृत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी आपण पांडुरंगाला स्मरतो. पण माझ्यासाठी महाराष्ट्रातील बारा कोटी जनता विठ्ठल-रखुमाईसारखी असून आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपले दर्शन घेण्याचा मला योग आला. हा दिवस माझ्यासाठी भाग्याचा आहे. पांडुरंग आपल्या जीवनात आनंद आणो. आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, चिंचवडला भक्ती आणि शक्तीची परंपरा आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात चापेकर बंधूचे योगदान मोलाचे आहे. चापेकर बंधूंचे स्मारक उभारले जाणार असून क्रांतीकारकांच्या परंपरेला अभिवान करण्यासाठी हे संग्रहालय उभारले जाणार आहे.श्रावण हर्डीकर यांनी आभार व सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.

..........................प्रोटोकॉलचे उल्लंघनमहापालिकेचा कार्यक्रम असताना शासकीय कार्यक्रमांसाठी असणाऱ्या प्रोटोकॉलचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून आले. पहिल्या रांगेत महापालिकेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांना जागा दिली नव्हती. त्याऐवजी महापालिकेत कोणतेही पद न भूषविणारे भाजपाचे पदाधिकारीच पहिल्या रांगेत बसले होते. महापालिकेच्या व्यासपीठावर भाजपाच्या शहर पदाधिकाºयांचाच भरणा अधिक होता. तर महापालिकेतील गटनेते मागील रांगेत बसले होते. 

........................गोंधळ होऊ लागल्याने आटोपते घेतले भाषण मराठा मोर्चा आणि घर बचाव संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे कार्यक्रमास अभूतपूर्व बंदोबस्त होता. तपासणी करूनच नागरिकांना कार्यक्रम स्थळी सोडले जात होते. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू झाल्यानंतर दहा मिनिटांत प्रेक्षकांतील एका महिलेने उभे राहून घोषणा बाजी केली. त्यावेळी पोलिसांनी तिला पकडून बाहेर नेले. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर नागरिक उभे राहिले होते. काही काळ नागरिक उठून उभे राहून मागे काही झाले आहे का? हे पाहत होते, ही बाब मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आली. त्यांनी भाषण आटोपते घेतले.

टॅग्स :PuneपुणेTaxकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसgirish bapatगिरीष बापटLakshman Jagtapलक्ष्मण जगताप