शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पवनेचे प्रदुषण रोखण्याठी मैला शुध्दीकरण प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 23:17 IST

चिंचवड आणि वाल्हेकरवाडीला केंद्र.  केशवनगर आणि वाल्हेकरवाडी येथील अस्तित्वातील पंपींग स्टेशनच्या जागा या जलसंपदा विभागाने दर्शविलेल्या निळया पूररेषेच्या अंतर्गत येत आहेत.

पिंपरी :  पवनेचे प्रदूषण रोखण्यासाठी चिंचवड आणि वाल्हेकरवाडी येथे महापालिकेच्या वतीने मैलाशुृघ्दीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून डिसेंबर २०२० मध्ये नव्याने आलेल्या एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीनुसार जलसंपदा विभागाने दर्शविलेल्या पूररेषाअंतर्गत हे मैलाशुध्दीकरण केंद्र बांधणे आता शक्य होणार आहे.

पवनेचे वाढते प्रदूषण हा नेहमीच चर्चेचा आणि चिंतेचा मुद्दा राहिला आहे. पवना नदीमध्ये नाल्यांद्वारे थेट मिसळणारे सांडपाणी मैलाशुध्दीकरण केंद्रातून प्रक्रिया करुनच सोडणे अपेक्षित आहे. अद्यापही नदीपात्रात सांडपाणी मिसळण्याचे प्रमाण मोठे आहे.त्यावर उपाययोजना म्हणून चिंचवड - केशवनगर आणि वाल्हेकरवाडी येथे मैलाशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. चिंचवड येथील मैलाशुध्दीकरण केंद्रासाठी ११ कोटी ५० लाख तर, वाल्हेकरवाडी येथील केंद्रासाठी १२ कोटी रुपयांची अंदाजत्रकीय तरतूद  ठेवण्यात येणार आहे. केशवनगर आणि वाल्हेकरवाडी येथील अस्तित्वातील पंपींग स्टेशनच्या जागा या जलसंपदा विभागाने दर्शविलेल्या निळया पूररेषेच्या अंतर्गत येत आहेत. राज्य शासनाच्या डिसेंबर २०२० मध्ये नव्याने आलेल्या एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीनुसार जलसंपदा विभागाने दर्शविलेल्या पुररेषा अंतर्गत नवीन मैलाशुध्दीकरण केंद्र बांधणे आता शक्य होणार आहे. चिंचवड आणि केशवनगर ,सर्व्हे क्रमांक २९२ येथे ९५० चौरस मीटर क्षेत्रात महापालिकेचे पंपींग स्टेशन अस्तित्वात आहे. सद्यस्थितीत केशवनगर आणि आजूबाजूच्या भागातील मैलापाणी पवना नदी किनारी असलेल्या केशवनगर पंपींग नलिकेद्वारे पाठविले जाते. केशवनगर पंपींग स्टेशन आवारातच मैलाशुध्दीकरण केंद्र बांधल्याने वीजबचत होणार आहे.वाल्हेकरवाडी सर्व्हे क्रमांक ८६ येथे ९५० चौरस मीटर क्षेत्रात महापालिकेचे पंपींग स्टेशन अस्तित्वात आहे. सध्या या भागातील मैलापाणी गोखले पार्क पंपींग स्टेशनद्वारे भाटनगर मैलाशुध्दीकरण प्रकल्पात पाठविण्यात येते. या भागातील मैलापाणी गुरुत्व वाहिनीद्वारे (ग्रॅव्हिटी लाइन) गोखले पार्क पंपींग स्टेशनपर्यंत, गोखले पार्क पंपींग स्टेशनपासून पंपींग नलिकेद्वारे भाटनगर मैलाशुध्दीकरण प्रकल्प येथे पाठविण्यात येते. मैलापाणी नदीलगत असलेल्या ग्रॅव्हिटी लाइनद्वारे आणि पंपींग नलिकेद्वारे मैलाशुध्दीकरण प्रकल्प येथे पाठवित असताना मलनिस्सारण नलिकेतून अनेक ठिकाणी गळती होते.मैलापाणी पवना नदीत मिसळून नदीचे प्रदूषण वाढत आहे. वाल्हेकरवाडी आणि आजूबाजूच्या भागातील मैलापाणी गोखले पार्क पंपींग स्टेशनद्वारे भाटनगर मैलाशुध्दीकरण प्रकल्प येथे पाठविण्यात येते . त्यासाठी येणारा खर्च, मलनिस्सारण नलिकांच्या देखभाल दुरुस्तीचा होणारा खर्च पाहता वाल्हेकरवाडीला स्वतंत्र मैलाशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण