शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

मौजमजेसाठी दरोड्याचा प्लॅन आखून लुटली सात लाखांची रोकड; बनाव करणाराच निघाला आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 21:01 IST

२४ तासांत आरोपींना ठोकल्या बेड्या

पिंपरी : वाहनचालक व एक जण कंपनीची रोकड घेऊन जात असताना पाच जणांनी अडवून मारहाण केली. तसेच सात लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेली. रोकड चोरीला गेल्याचा बनाव करणाऱ्या वाहनचालकासह तीन आरोपींना २४ तासांत अटक करण्यात आली. त्यांच्याकडून साडेचार लाखांची रोकड हस्तगत केली. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली.    

यश गणेश आगवणे (वय १९, रा. रुपीनगर, तळवडे), कासीम मौला मुर्शिद (वय २१), सागर आदिनाथ पवार (वय १८, दोघे रा. ओटास्कीम, निगडी) आणि अभिषेक शिरसाठ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिरसाठ हा साई स्टील ट्रेडर्स या कंपनीत चालक म्हणून कामाला होता. दरम्यान, बुधवारी (दि. १) रात्री कंपनीचे पैसे घेऊन जात असताना चिंचवड येथे पाच अज्ञात इसमांनी मारहाण करीत त्याच्याकडील सात लाख तीन हजार ६५० रुपये असलेली बॅग हिसकावून नेली. याप्रकरणी अज्ञात इसमांवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

दरोडा विरोधी पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. आशिष शिरसाठ याच्या बोलण्यात तफावत असल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे शिरसाठ याच्यावर पोलिसांनी पाळत ठेवली. दरम्यान, शिरसाठ याचे मित्र चिखली येथील एका बेकरीच्या मागे असून त्यांनी हा गुन्हा केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे आणि कर्मचारी आशिष बनकर यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून आरोपी आगवणे, मुर्शिद आणि पवार या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार लाख ४५ हजारांची रोकड आणि एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. त्यांनी अन्य दोन साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.   

दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, उपनिरीक्षक मंगेश भांगे, कर्मचारी आशिष बनकर, नितीन लोखंडे, महेश खांडे, राहुल खारगे, उमेश पुलगम, राजेंद्र शिंदे, विक्रांत गायकवाड, गणेश कोकणे, प्रवीण कांबळे, प्रवीण माने, सागर शेडगे, राजेश कौशल्ये यांच्या पथकाने ही कामगिरी केली.  कर्ज, मौजमजेसाठी केला गुन्हा  आरोपी हे एकमेकांच्या परिचयाचे असून उसनवारी घेतलेल्या पैशांचे त्यांच्यावर कर्ज होते. तसेच त्यांना मौजमजा करण्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे कंपनीचे पैसे लुटायचे, असा प्लॅन आरोपींनी केला. कंपनीचा वाहनचालक अभिषेक शिरसाठ हा या कटात सामील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यातून मिळणाऱ्या पैशांमध्ये जास्त हिस्सा आरोपी शिरसाठ याला देण्याचे ठरले होते. आरोपी मुर्शिद आणि आगवणे हे सराईत गुन्हेगार आहेत. मुर्शिद याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे आहेत. तर, आगवणे याच्यावर निगडी येथे यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक