शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा अभियान, तरीही महिला असुरक्षितच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 02:20 IST

हिंजवडीत विनयभंगाच्या घटना; पोलीस आयुक्तांच्या बदलीनंतर उपक्रम बासनात

पिंपरी : पुणे शहर पोलिसांच्या माध्यमातून तत्कालीन पोलीस अयुक्त रश्मी शुक्ला यांच्या पुढाकाराने हिंजवडी, वाकड परिसरातील महिलांसाठी सुरक्षिततेच्या विविध उपाययोजना, उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये वॉक विथ कमिशनर, बडी कॉप आणि प्रतिसाद अ‍ॅप आदी उपक़्रमांचा समावेश होता. तत्कालीन पोलीस आयुक्त शुक्ला यांची बदली झाली. अन् पुन्हा हिंजवडीत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.हिंजवडीत एका उच्चभ्रू वसाहतीत फेरफटका मारण्यासाठी बाहेर आलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली. तरुणाने फेरफटका मारणाऱ्या मुलीला मिठी मारली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणास अटक केली आहे. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने राबविलेल्या उपाययोजनांमध्ये ‘बडी कॉप’ या उपक्रमाचे कौतुक झाले होते. बडी कॉप उपक्रमात आयटीपार्क परिसरात राहणाºया नोकरदार महिला आणि शिक्षण घेणाºया तरुणी यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले. नोकरदार महिला आणि तरुणींनी कामाच्या ठिकाणी काही समस्या असतील तर बडी कॉपच्या माध्यमातून त्या समस्या व्यक्त कराव्यात. बडी कॉपमध्ये काही महिला पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून तातडीने अडचणीत असणाºया महिलांना मदत मिळू शकते. त्या समस्येवर तोडगा काढण्याची यंत्रणा कार्यान्वित केली होती.तळवडे सॉप्टवेअर पार्कमधील अभियंता तरुणी अंतरा दास हिचा खून झाला. त्यानंतर हिंजवडीतील आयटी कंपनीत काम करणाºया रसिला राजू ओपी या तरुणीचा गळा आवळून खून करण्यात आला. या घटनेमुळे आयटी क्षेत्रात काम करणाºया महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला. पुणे शहर पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन विविध उपाययोजना आखल्या गेल्या. थेट पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन अशा समस्या मांडण्यास तरुणी पुढे येऊ लागल्या. पोलीस महिला सुरक्षा अभियानाचा गवगवा झाला. महिला सुरक्षिततेच्या समस्या मात्र अद्यापही तशाच आहेत. नव्याने झालेल्या आयुक्तालयांतर्गत आता हिंजवडी पोलीस ठाण्याचा समावेश झाला आहे.आयुक्तालयांकडून महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने काय उपाययोजना केल्या जाणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. विशेषत: हिंजवडी, वाकड या परिसरात नोकरदार महिला आणि शिक्षण घेणाºया तरुणी अशा महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना अंमलात आणल्या जाव्यात, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. केवळ विनयभंग आणि बलात्काराच्या घटनाच नाहीत, तर सोनसाखळी चोरीच्या घटनांचे प्रमाण मोठे आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाWomenमहिला