शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेची सुरक्षा व्यवस्था होणार कडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 01:22 IST

सीसीटीव्ही वॉच : व्हिजिटर व्यवस्थापन सिस्टीम अद्ययावत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक असते. सुरक्षेच्या दृष्टीने मेटल डिटेक्टरमधून तपासणी करून नागरिकांना मनपा भवनात प्रवेश दिला जात असला आणि सीसीटीव्हीचा वॉच असला, तरी महापालिका भवनात आलेल्या व्यक्तीची माहिती उपलब्ध होत नसते. त्यामुळे महापालिकेची सुरक्षा कडक करण्याच्या दृष्टीने मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरील व्हिजिटर व्यवस्थापन सिस्टीम अद्ययावत करण्यात येणार आहे.

पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरीत महापालिकेची चार मजली प्रशासकीय इमारत आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्षनेता यासह विविध विषय समिती सभापतींची दालने आहेत. या मुख्य प्रशासकीय इमारतीत शहरातील नागरिक आपल्या विविध कामांसाठी, त्याचे निराकरण करण्यासाठी दररोज येत असतात. या नागरिकांची नोंद घेण्यासाठी हस्तलिखित गेट पास देण्यात येतो. सन २०१२ ते २०१६ या काळात गेट पास संगणकीय मशिनद्वारे दिला जात होता. हा संगणक जुन्या मॉडेलचा असल्याने तो बंद पडला आहे.‘लोकमत’च्या वृत्ताची दखल४महापालिका कार्यालयाच्या सुरक्षेबाबत लोकमतने स्टिंग आॅपरेशन केले होते. त्यावरून महापालिका सर्वसाधारण सभेत गोंधळही झाला होता. महापालिकेत येणाऱ्यांची माहिती अद्ययावतपणे उपलब्ध होणार आहे. नवीन यंत्रणेद्वारे व्यक्तीची माहिती, छायाचित्र, कोणत्या कामासाठी आली आहे. ही माहिती नोंदविली जाणार आहे. लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी सुरक्षा यंत्रणा कडक करण्यासाठी नवीन उपाययोजना करण्याचे नियोजन केले आहे. त्याविषयीचा प्रस्ताव महापालिका माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिला आहे.महापालिका भवनात व्हिजिटर येत असतात. काही वर्षांपूर्वी व्हिजिटर पास हे संगणकाद्वारे देण्यात येत होते. मात्र, आता ही यंत्रणा तीन वर्षांपासून बंद पडली आहे. त्यामुळे सुरक्षा विभागाला व्हिजिटर पास व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक सिस्टीम सॉफ्टवेअरसह दोनसंगणक संच सुरक्षा विभागास उपलब्ध करून देण्याची गरज आहे. या यंत्रणेमध्ये व्हिजिटरच्या फोटोची सोय असावी, त्याचा डेटा भरण्यासाठी त्याची संपूर्ण माहिती घेण्याची व्यवस्था असावी.- विलास मडिगेरी,अध्यक्ष, स्थायी समिती.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे