पिंपरी : काळभोरनगर जवळ मोटारीची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील महिला जखमी झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर मोटार रस्त्याच्या कडेला सोडून मोटारचालक पळून गेला. त्याच्या मोटारीत चालकाच्या आसनाजवळ बियरची बाटली, चकना, काही पुड्या असा माल आढळून आला आहे. पोलिसांच्या हाती न लागल्याने तो मद्यधुंद नशेत वाहन चालवत होता की, नाही याबद्दल काही स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मोटारीची धडक बसल्याने दुचाकीवरील महिला, तरुण बीआरटी मार्गावर उडून पडले. त्यात महिला गंभीर जखमी झाली. मोटारीच्या (एमएच १४ बीएक्स २९२०) मालकासंबंधीची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र, तो वेळीच हाती न लागल्यास तो मद्याच्या नशेत वाहन चालवित होता, हे सिद्ध करणे अडचणीचे होणार आहे. त्यामुळे पोलिसांना ड्रंक अॅण्ड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करण्यास अडचण निर्माण झाली आहे. लवकरच तो हाती लागेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
अपघातानंतर पळालेल्या चालकाचा शोध सुरू
By admin | Updated: April 27, 2017 04:58 IST