शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड शहरातील शाळा ३ जानेवारीपर्यंत बंदच राहणार : महापौर माई ढोरे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 20:28 IST

कोरोना परिस्थिती लक्षात घेवूनच शाळा उघडण्यात येणार आहे.

पिंपरी :  कोरोना विषाणूची भिती कायम असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा,  महाविद्यालये ३ जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत, अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरू करण्याचे नियोजन केले होते.शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता १३ डिसेंबर पर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर महापालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांनी शाळा उघडण्यात विरोध केला होता. त्यानंतर १३ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही मुदत रविवारपर्यंत आहे. मात्र, यापुढेही शाळा बंदच ठेवण्यात येणार आहेत.

महापौर ढोरे म्हणाल्या, ‘‘शाळा सुरू करण्यांसदर्भात शासनाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेशात नमूद केलेले आहे. त्यामुळे शहरातील कोरोना परिस्थिती लक्षात घेवूनच शाळा उघडण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने, शाळा, महाविद्यालयातील ९ ते १२ वीचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोविड आजाराबाबत चाचणी पुर्ण झाली आहे.

शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा निजंर्तुकीकरण, तापमान मोजणीसाठी गन, डिजिटल थर्मामिटर, हात धुण्याची व्यवस्था, सोशल डिस्टनसिंग प्लॅन इत्यादी गोष्टींची पूर्तता करण्यात येणार आहे. त्यामुळे ३ जानेवारीपर्यंत  महानगरपालिका हद्दीतील शाळा बंदच रहाणार आहेत.  कोरोनाचा आढावा घेवुन महापालिका हद्दीतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.’’सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, ‘‘ सद्या पालकांची संमतीपत्र घेणे सुरु आहे. आत्तापर्यंत महापालिकेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची फक्त ११३२ संमतीपत्रे प्राप्त झाली आहेत. यामुळे तुर्तास शाळा सुरु करणे योग्य रहाणार नाही.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या