शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतील ‘लालबत्ती’ खेळ ठरतोय धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 15:54 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक शाळांमध्ये सध्या एक वेगळ्या खेळाची चर्चा होतेय.

ठळक मुद्दे पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक शाळांमध्ये सध्या एक वेगळ्या खेळाची चर्चा होतेय. तो खेळ म्हणजे लालबत्ती. तुमचा पाल्य जर शाळेत जाऊन अशा प्रकारचा खेळ खेळत असेल, तर वेळीच त्याला सावध करण्याची आवश्यकता आहे.

- स्वप्निल हजारे 

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक शाळांमध्ये सध्या एक वेगळ्या खेळाची चर्चा होतेय. तो खेळ म्हणजे लालबत्ती.  तुमचा पाल्य जर शाळेत जाऊन अशा प्रकारचा खेळ खेळत असेल, तर वेळीच त्याला सावध करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा हा खेळ विद्यार्थ्यांसाठी धोकादायक व जीवघेणा ठरू शकतो.  पुर्वी तुम्ही आम्ही, गंमत म्हणून ‘लालबत्ती’ हा खेळ खेळला असाल. पण गंमत म्हणून खेळला जाणारा हा खेळ सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक महाविद्यालयात विद्याथ्र्याचा छंद होऊ लागला आहे. हा विद्यार्थ्यांचा खेळ तुमच्या पाल्याच्या जीवावरही बेतू शकतो. त्याविषयीची घटना नुकतीच कुदळवाडीतील एका खासगी शाळेत घडला. या खेळाच्या निमित्ताने एका विद्याथ्र्याला मित्रंनी जबर मारहाण केली. हे प्रकरण अगदी पोलीस चौकीर्पयत गेले. 

खेळातील हे  प्रकरण पोलिसांपर्यत पोहचल्यानंतर या खेळातील गांभीर्य सर्वासमोर आला. पोलिसांनी विद्याथ्र्यांना व शाळेला  समज देऊन हे प्रकरण समुपदेशनाद्वारे हातळले.  आता हा जीवघेणा खेळ रोखण्यासाठी शाळा, पालक तसेच पोलिसांनीही विशेष पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. 

काय आहे लालबत्ती खेळया खेळात एका मुलाला लक्ष्य करून त्याच्या तोडांवर जर्कीन अथवा स्वेटर टाकले जाते. मग दहा ते बारा मुलांकडून लाथा-बुक्यांनी मारहाण केली जाते. असाच प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातील कुदळवाडीतील एका खाजगी शाळेत काही दिवसापूर्वी  घडला. या शाळेतील नववीत शिकणा:या एका मुलांला दहा ते बारा मित्रंनी माराहण केली.त्यात तो जखमी झाला होता. 

पोलीसकाका उपक्रमपिंपरी-चिंचवड शहरातील पोलिसांनी प्रत्येक शाळा व महाविद्यालयात जाऊन ‘पोलिस काका’ उपक्रम सुरू केला आहे.  शाळेत जाऊन विद्याथ्र्याना समुपदेशन केले जात आहे. सध्या या उपक्रमांचे अनेक शाळा, महाविद्यालयाने स्वागत केले असून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.