शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

नाव सुशोभीकरणाचे, उधळपट्टी कोट्यावधींची, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 03:17 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निधी अभावी विद्यार्थ्यांच्या फेलोशिप कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी बंद केल्या असतानाच कॅम्पसमध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. याला चाप लावण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या फेलोशिपवर घाला घालण्यात आल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निधी अभावी विद्यार्थ्यांच्या फेलोशिप कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी बंद केल्या असतानाच कॅम्पसमध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. याला चाप लावण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या फेलोशिपवर घाला घालण्यात आल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसला मुळातच निसर्गसंपन्नतेची देणगी लाभली आहे. हिरव्यागार वनराईने हा परिसर नटलेला आहे. मात्र, तरीही कृत्रिम सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधपट्टी करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपर्यंत व्यवस्थापन परिषद, सिनेट अस्तित्वातच नसल्याने यावर कोणाचाच वचक राहिलेला नव्हता. आता नव्याने आलेल्या व्यवस्थापन परिषद व सिनेट सदस्यांकडून याविरोधात आवाज उठविला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यातील सर्वांत मोठा वार्षिक अंदाजपत्रक मांडणारे श्रीमंत विद्यापीठ आहे. पुणे, नगर व नाशिक असे ३ जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या विद्यापीठाची विद्यार्थी संख्या खूपच मोठी आहे. त्याचबरोबर विद्यापीठात प्रवेश मिळविण्यासाठी लाखोंच्या संख्येने विद्यापीठाकडे अर्ज येतात. या विद्यार्थ्यांचे नियमित शुल्क, प्रवेश अर्जांचे शुल्क याव्दार कोट्यवधी रुपयांचा निधी दरवर्षी विद्यापीठाकडे जमा होतो आहे. मात्र, हा पैसा कोणतेही नियोजन न करता सुशोभीकरण, जंगलाला मारलेली अनावश्यक कंपाऊंड व बांधकामे यावर खर्ची पाडला जात आहे.विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते पर्यावरण शास्त्र विभागापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने बगीचा बनविण्यात आला. मात्र, हा बगीचा बनविल्यानंतर काही दिवसांत तिथल्या काही भागात खोदाई करण्यात आली.विद्यापीठात अनेक महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. या पुतळ्यांच्या परिसरात बगीचे उभारण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले आहेत. इतके खर्च करून उभारण्यात आलेल्या या उद्यानांमध्ये कुणालाही प्रवेश दिला जात नाही.विद्यापीठातील खेळाचे मुख्य मैदान गेल्या ९ महिन्यांपासून चित्रपटाच्या सेटसाठी देण्यात आले आहे. विविध खेळांची मैदाने बनविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कामे सुरू आहेत. त्याचबरोबर नुकतीच व्यवस्थापन परिषदेकडून आणखी काही कामांच्या खर्चांसाठी कोट्यवधी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.मात्र, प्रत्यक्षात या मैदानांचा विद्यापीठातील खेळाडू किती वापर करतात, यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे. खेळांच्या मैदानांवर झालेलाखर्च आणि विद्यार्थ्यांकडून त्याचा झालेला वापर याचे आॅडिट करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यातयेत आहे.एका दिवसात ५०० विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीकुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी निधी नाही म्हणून पीएच.डी. व एम.फिल विद्यार्थ्यांचे विद्यावेतन बंद केले जात असताना, दुसरीकडे अधिकाऱ्यांवर भत्त्यांची मोठी खैरात केली जात आहे, याबाबतचे वृत्त बुधवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर, त्याचे जोरदार पडसाद विद्यार्थ्यांमध्ये उमटले. कुलगुरूंच्या या दुजाभावाविरुद्ध विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. डाप्सा संघटनेने याविरोधात स्वाक्षरी मोहीम घेण्यास सुरुवात केली, एका दिवसात ५०० विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून, या आंदोलनाला पाठिंबा दिला.आज ठरणार आंदोलनाची दिशाविद्यावेतन बंद करण्याच्या विरोधातील आंदोलनाबाबत विद्यार्थ्यांनी गुरुवार, दि.१४ जून रोजी दुपारी सव्वाचार वाजता अनिकेत कॅन्टिन येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे.भत्त्यांच्या खैरातीचे आणखीन गैरप्रकारसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अधिकाºयांवर करण्यात येणाºया भत्त्यांच्या खैरातीचे आणखीन काही गैरप्रकार उजेडात आले आहेत. परीक्षा विभाग, वित्त विभाग इथे बेकायदेशीरपणे भत्ते लाटले जात आहेत. त्याविरोधातही विद्यार्थ्यांकडून आक्रमक भूमिका घेण्यात येणार आहे.कुलगुरूंचे मौनपीएच.डी. व एम.फिलचे विद्यावेतन बंद करण्यात आल्याच्या निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे. याबाबत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे; मात्र ते याबाबत काहीच बोलायला तयार नाहीत.जॉगिंग ट्रॅक वापराविना पडूनसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातीलप्र-कुलगुरूंच्या निवासस्थानाशेजारी असलेल्या खाणीच्या बाजूने गोलाकार जॉगिंग ट्रॅक विद्यापीठ प्रशासनानेउभारला. त्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्ची पाडण्यात आला; मात्र हा ट्रॅक बंद ठेवण्यात आला असून, अनेक महिन्यांपासून तो वापराविना पडून आहे, याकडे कुलगुरू कधी लक्ष देणार, अशी विचारणा विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठnewsबातम्या