शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

‘ज्ञानोबा- तुकाराम’ च्या गजरात लाखो भाविकांच्या भक्तीचा महासागर विठ्ठलाच्या भेटीला; तुकोबांचे पंढरपूरकडे प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 16:50 IST

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदयाचे श्रध्दास्थान असलेले जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 337 व्या पालखी सोहळ्यासाठी आज दुपारी तीनच्या सुमारास प्रस्थान ठेवले

देहूगाव : महाराष्ट्रातील वारकरी संप्रदयाचे श्रध्दास्थान असलेले जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 337 व्या पालखी सोहळ्यासाठी आज दुपारी तीनच्या सुमारास प्रस्थान ठेवले. हा वैष्णवांचा भक्तीमहासागर आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूरकडे निघाला. अत्यंत उत्साही आणि प्रसन्न वातावरण, तुतारी, टाळ मृदंगाच्या निनाद, विण्याचा झंकार करीत वारकऱ्यांची अत्यंत मुक्तपणे ध्येयभान हरखून विविध पाऊले खेळत लाखो भाविक सहभागी झाले होते.  खासदार श्रीरंग बारणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, आमदार सुनिल शेळके, त्यांच्या पत्नी सारीका शेळके, माजी मंत्री संजय भेगडे, भाग्यवान वारकरी नांदेडच्या आजामेळा दिंडीचे वीणेकरी गोविंद गवलवार यांच्या हस्ते महापूजा झाली. यानंतर श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवण्यात आल्या. हा पालखी सोहळा सायंकाळी सहाच्या सुमारास इनामदार वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी विसावला.

पायी आषाढी वारीत सहभागी झालेले वारकरी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका आणि महिला वारकऱ्यांनी डोक्यावर तुळशीवृंद घेऊन मुखी हरिनामासह ‘‘ज्ञानोबा- तुकाराम’’ हा जयघोष करीत हा पालखी सोहळा लाखो भाविकांचा भक्तीचा महासागर पंढरीच्या वाटेला लागला. चोपदाराचा दंड आणि शिंगाड्याच्या आवाज होताच साऱ्या आसमंतांत मृदंग, टाळ,विणा यांच्या निनाद गुजला आणि सार देऊळवाडा परिसर दणाणून गेला होता. पहिल्या मुक्कामासाठी इनामदार वाड्याकडे रवाना झाला.     प्रथेनुसार प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने पहाटे पाच वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व शीळा मंदिरात संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, विशाल महाराज मोरे व अजित महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. साडे सहा वाजता तपोनिधी पालखी सोहळ्याचे जनक नारायण महाराजांच्या समाधिची व सात वाजता वैंकुठगमण मंदिरात महापूजा संस्थानचे विश्वस्थांच्या हस्ते करण्यात आली. सकाळी दहा वाजता पालखी प्रस्थान सोहळ्याच्या काल्याचे किर्तन रामदास महाराज मोरे यांनी अनंत ब्रम्हांडे उदरी | हरि हा बालक नंदा घरी || नवल केवढे केवढे | न कळे कान्होबाचे कोडे || या काल्याच्या अभंगाने प्रस्तान सोहळ्याच्या सप्ताहाची केले. या किर्तनाने या अखंड हरिणाम सोहळ्याची सांगता झाली. तत्पुर्वी सकाळी आठ वाजता पाथरुडकर दिंडी व गंगा म्हसलेकर श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका डोक्यावर घेऊन म्हसलेकर मंडळींनी येथील घोडेकर सराफ यांच्या घरी पादुकांना चकाकी देण्यासाठी नेण्यात आल्या. 

येथे पाद्यपुजा अभंग आरती करण्यात आली. भालचंद्र घोडेकर, सुनिल घोडेकर, ऋषिकेश घोडेकर यांनी पादुकांना चकाकी दिली. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास म्हसलेकर मंडळी व पाथरुडकर दिंडी यांनी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका सेवेकरी गंगा म्हसलेकर यांनी या पादुका डोक्यावर घेवून इनामदार वाड्यात दाखल झाले. इनामदार वाड्यात दिलीप महाराज मोरे गोसावी यांच्या हस्ते पादुकांची विधीवत महापूजा करण्यात आली. या पादुका काल्याचे किर्तन झाल्यानंतर आणि इनामदार वाड्यातील पूजा उरकल्यानंतर पादुका पालखीचे मानकरी गंगा म्हसलेकर मंडळींच्या ताब्यात देण्यात आल्या. म्हतारबा दिंडीसह ह्या पादुका डोक्यावर घेऊन टाळ मृदंगाच्या तालवर भक्तीमय वातावरणात वाजत गाजत मुख्यमंदिरात आणण्यात आल्या येथे मंदिराला प्रदक्षिणा घालुन भजनी मंडपात आणल्या. याच वेळी प्रस्तान सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी आलेल्या दिंड्या आपआपल्या क्रमाने मुख्यमंदिरात प्रवेश करीत होत्या. या सोहळ्यासाठी मानाच्या दिंड्या, फडकरी व विणेकरी यांनी महाद्वारातून मंदिराच्या आवारात येऊन भजन म्हणत आपला शीन भाग घालवत पावले खेळत मंदिराला प्रदक्षिणा घालत होते व उत्तर दरवाजाने बाहेर पडत होत्या.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022sant tukaramसंत तुकारामSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा