शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी - चिंचवडच्या अपर पोलीस आयुक्तपदी डॉ. संजय शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 13:03 IST

संजय शिंदे यांनी रत्नागिरी, कल्याण, सातारा, लातूर, चंद्रपूर अशा शहरांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केले आहे

ठळक मुद्देआर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभागात देखील त्यांनी प्रमुख पदांची सांभाळली धुरा

पिंपरी : शहराचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची ठाणे शहर येथे बदली झाली. त्यांच्या जागी वर्णी लागलेले डॉ. संजय शिंदे यांनी पिंपरी- चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय १५ ऑगस्ट २०१८ रोजी कार्यान्वित झाले. शहराचे पहिले अपर पोलीस आयुक्त म्हणून मकरंद रानडे यांनी जबाबदारी सांभाळली. दहा महिन्यात त्यांची पोलीस महानिरीक्षक म्हणून पदोन्नतीवर अमरावती परिक्षेत्र येथे बदली झाली. त्यानंतर रामनाथ पोकळे यांनी मे २०१९ रोजी शहराचे अपर पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. आयुक्तालयातील कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांची ठाणे शहर येथे बदली झाली. त्यामुळे पुणे शहर येथील डॉ. संजय शिंदे यांची अपर आयुक्त म्हणून वर्णी लागली.   

रामनाथ पोकळे यांनी सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचा धडाका लावला होता. तसेच मोक्कांतर्गत देखील मोठी कारवाई केली. त्यामुळे शहरातील गुन्हेगारांनी त्यांची धास्ती घेतली होती. अशीच धडाकेबाज कारवाई नवे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडून अपेक्षित आहे.  डॉ. संजय शिंदे यांची शांत व संयमी अधिकारी म्हणून पोलीस दलात ओळख आहे. त्यांना कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. रत्नागिरी, कल्याण, सातारा, लातूर, चंद्रपूर अशा शहरांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केले आहे. आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभागात देखील त्यांनी प्रमुख पदांची धुरा सांभाळली आहे. उल्लेखनीय कार्याबद्दल शासनाच्या विशेष पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित केले आहे.

नव्या उपायुक्तांची प्रतीक्षा

पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांची पदोन्नतीने पुणे शहरात पोलीस उपमहानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग येथे बदली झाली. मात्र त्यांच्या जागेवर अद्याप कोणाचीही वर्णी लागलेली नाही. त्यामुळे नव्या उपायुक्तांची प्रतीक्षा आहे. नवे उपायुक्त उपलब्ध होऊन रुजू होत नाहीत तोपर्यंत सुधीर हिरेमठ यांच्याकडेच पदभार राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcommissionerआयुक्तGovernmentसरकार