शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथील किलीमांजरो पर्वतावर शिवरायांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:36 IST

टांझानिया येथील सर्वांत उंच माउंट किलीमांजरो या पर्वतावर शिवजयंती साजरी करीत सह्याद्रीच्या मावळ्यांनी महाराजांना अनोखी मानवंदना दिली. ज्येष्ठ गिर्यारोहक सुशील सुधीर दुधाणे आणि सूर्यकांत शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.

ठळक मुद्देशिखरमाथ्यावर भगवा फडकवत गारद देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदनापर्वतावर शिवरायांच्या दोन फुटी पुतळ्याचा अभिषेक करून छत्रपती शिवरायांना केले अभिवादन

जाधववाडी : दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथील सर्वांत उंच माउंट किलीमांजरो या पर्वतावर शिवजयंती साजरी करीत सह्याद्रीच्या मावळ्यांनी महाराजांना अनोखी मानवंदना दिली. ज्येष्ठ गिर्यारोहक सुशील सुधीर दुधाणे आणि सूर्यकांत शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.‘लिंगाणा’ हा तब्बल १००० फूट उंचीचा पर्वत त्यांनी अवघ्या २२ मिनिटांत चढून आणि २३ मिनिटांमध्ये उतरण्याचा विक्रम केला आहे. या धाडसी मोहिमेदरम्यानचे अनुभव या गिर्यारोहकांनी सांगितले आहे. या मोहिमेदरम्यान खुभ हट ते तासनिया पॉईंटची चढाई अत्यंत कठीण होती. हाडे गोठवणारी थंडी आणि अतिवेगाने येणाऱ्या वाऱ्यामुळे या चढाईमध्ये अडचणी येत होत्या. त्यामुळे ड्रोन उडवणे जोखमीचे होते. शिवाय फोटो काढणेदेखील शक्य नव्हते.  बोचणारे वारे आणि कापऱ्या थंडीला मात देत या मावळ्यांनी खुभ हटच्या पायथ्याशी शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ड्रोन उडवून शूटदेखील करण्यात आले. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने झेंडा बाहेर काढणे कठीण झाले होते. मात्र तरीही शिखरमाथ्यावर भगवा फडकवत गारद देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर खुभ हटच्या पायथ्याशी मोठ्या दिमाखात शिवजयंती साजरी करण्यात आली. गिर्यारोहकांची या धाडसी मोहिमेला बंगळूरच्या माउंटिंग क्लबचे नीरज माळवे आणि कीर्ती ओसवाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शिवरायांच्या पुतळ्यास पर्वतावर अभिषेकदक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथील सर्वांत उंच किलीमांजरो या पर्वतावर शंकू, कोंबो, मवेन्झी आणि शिरा हे निष्क्रिय ज्वालामुखी आहेत. हा पर्वत सर करण्याचे धाडस फार कमी गिर्यारोहकांनी दाखवले आहे. हा पर्वत सर करण्याची धाडसी मोहीम फत्ते करत सह्याद्रीच्या या मावळ्यांनी शिवजयंतीला या पर्वतावर छत्रपती शिवरायांच्या दोन फुटी पुतळ्याचा अभिषेक करून छत्रपती शिवरायांना अभिवादन केले.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSouth Africaद. आफ्रिकाPuneपुणे