शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

RTE Admission| पोर्टल ठप्प असल्याने आरटीई प्रवेशाचा खोळंबा! पालकांची वाढली चिंता

By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: April 18, 2023 17:11 IST

ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेत आणि ऑनलाइन सर्व्हरमध्ये अनेक त्रुटी...

पिंपरी : आरटीईचे सर्व्हरही चालेना, वेबसाइट संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे पाल्यांचा प्रवेश होईल की नाही, अशी चिंता पालकांना सतावत आहे. शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत शासनामार्फत या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरून घेतले जात आहेत.

मात्र, या ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेत आणि ऑनलाइन सर्व्हरमध्ये अनेक त्रुटी आहेत. सर्व्हर संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार का, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित होत आहे. याशिवाय त्यामध्ये अनेक अडचणीदेखील येत आहेत. त्यामुळे प्रशासन आमच्या भावनांशी खेळत आहे का, असा सवालही पालक उपस्थित करत आहेत.

प्रवेश पडताळणी समितीचा निर्णय महत्त्वाचा-

निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश निश्चित करण्यापूर्वी प्रवेश पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. या पडताळणी समितीने कागदपत्रे योग्य असल्याचा शेरा दिल्यानंतरच संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित होणार आहे. योग्य कागदपत्रांअभावी पडताळणी समितीने अपात्र शेरा दिल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होणार आहे. मात्र, सर्व्हर चालत नसल्याने अलॉटमेंट लेटरच पालकांना मिळत नाही. त्यामुळे पालकांना प्रवेशाची चिंता सतावत आहे.

अलॉटमेंटसाठी पालक त्रस्त -

अर्ज करण्याच्या प्रक्रियेत पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेबसाइटसुद्धा मेसेज आल्यानंतर दोन दिवस बंदच होती. नवीन वेबसाइटही संथ गतीने सुरू आहे. सायबर कॅफेचालक वेबसाइट संथ असल्याकारणाने जादा रुपये घेतात. त्यामुळे पालकांना आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास होत आहे.- एक पालक

आरटीई संक्षिप्तमध्ये -

शहरातील एकूण जागा : ३ हजार २२५शहरातील एकूण शाळा : १७२

प्रवेशासाठी आलेले अर्ज : ११ हजार २३५

ज्या पालकांना प्रवेशाचे मेसेज आले आहेत, त्यांनी अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून कागदपत्रांची पडताळणी केंद्रावर पडताळणी करावी. सर्व्हर काही प्रमाणात संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये.- संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, महापालिका

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRight To Educationशिक्षण हक्क कायदा