शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

रिंगरोडसाठी ३०० कोटींचा खर्च, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ता आवश्यक असल्याने सत्ताधारी आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:12 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील रिंगरोड तयार करण्यासाठी सत्ताधारी आग्रही असून, एचसीएमटीआर विकसित करण्यासाठी महापालिकेला सुमारे ३०० कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील रिंगरोड तयार करण्यासाठी सत्ताधारी आग्रही असून, एचसीएमटीआर विकसित करण्यासाठी महापालिकेला सुमारे ३०० कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. त्यांपैकी रहाटणीतील कोकणे चौक ते काळेवाडी फाट्यापर्यंतच्या १५५० मीटर लांबी आणि ३० मीटर रुंंदीच्या रस्त्यासाठी २७ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या कामाची निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे रिंगरोड होणार हे निश्चित झाले आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका मंजूर विकास आराखड्यानुसार रहाटणी येथे कोकणे चौक ते काळेवाडी फाट्यापर्यंत ३० मीटर रुंद उच्चक्षमता द्रुतगती मार्गाचे आरक्षण आहे. साई चौकातील उड्डाणपुलाचे काम नवनगर विकास प्राधिकरणामार्फत सुरू आहे. ग्रेड सेपरेटरच्या कामाचे आदेश संबंधित ठेकेदारास दिले आहेत. साई चौकातील कामामुळे वाहतुकीच्या समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत. वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी नवीन मार्ग उपयोगी पडणार आहे.साई चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी कोकणे चौक ते काळेवाडी फाटा या ३० मीटर उच्चक्षमता द्रुतगती मार्गाचे (एचएसएमटीआर) पर्यायी रस्ता म्हणून नियोजन केले आहे. उच्चक्षमता द्रुतगती मार्ग विकसित नसल्यामुळे वाहतूक करणे शक्य नाही. त्यामुळे भविष्यात उच्चक्षमता द्रुतगती मार्ग विकसित करायचा आहे. या मार्गावरील अतिक्रमण, अवैध बांधकामे काढून टाकण्यासाठी १६ जून २०१७ रोजी बीआरटीएस स्थापत्य विभाग, तसेच बांधकाम परवानगी आणि अवैध बांधकाम नियंत्रण विभागामार्फत सयुक्तिक कारवाई केली. त्यात ३० मीटर उच्चक्षमता द्रुतगती मार्ग मोकळा केला आहे. तसेच रहाटणीतील कोकणे चौक ते काळेवाडी फाट्यापर्यंत १५५० मीटर लांबीचा व ३० मीटर रुंदीच्या उच्चक्षमता द्रुतगती मार्गावर पुन्हा अतिक्रमण किंवा अवैध बांधकामे होऊ नयेत म्हणून या ३० मीटर रुंद उच्चक्षमता द्रुतगती मार्गाचा विकास करणे आवश्यक आहे.या जागेची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१७-१८ मध्ये, तसेच या कामाचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेने अंदाजपत्रक तयार केले आहे. महापालिकेच्या २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात संपूर्ण रिंगरोड करण्याच्या कामास ३०० कोटी रुपये अर्थसंकल्पीय रकमेस मान्यता मिळाली आहे. रहाटणीतील कोकणे चौक ते काळेवाडी फाट्यापर्यंतच्या रस्त्यासाठी महापालिकेमार्फत निविदा प्रसिद्ध केली आहे.>असा आहे रिंगरोड ?१९९५च्या मंजूर विकास आराखड्यात उच्चक्षमता वाहतूक मार्ग वर्तुळाकार पद्धतीने रिंगरोड विकसित करण्याचे नियोजन आहे. महापालिका, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि लष्कराच्या हद्दीतून हा रिंगरोड जातो.रिंगरोडची एकूण लांबी ३० किलोमीटर असून, रुंदी ३० मीटर आहे. एमआयडीसी हद्दीतून पूर्व बाजूस १७.७८ किलोमीटर, तर पश्चिमेकडील भागातून ११.७३ किलोमीटर अंतरापर्यंत हा रिंगरोड आहे. पिंपरी महापालिका हद्दीतून पश्चिमेकडील कासारवाडी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी, थेरगाव, वाल्हेकरवाडी, आकुर्डी या गावांच्या हद्दीतून जातो.पुढे नवनगर विकास हद्दीतून, तसेच पूर्वेकडील निगडी, स्पाईन रस्ता, नेहरुनगर, पिंपरी आणि कासारवाडी या वर्तुळाकार भागातून तो जातो. सद्य:स्थितीत महापालिका, नवनगर विकास प्राधिकरण, एमआयडीसी आणि लष्कर हद्दीतील अंदाजे ६५ टक्के जागा ताब्यात आहे. या रिंगरोडसाठी प्रकल्प सल्लागार नेमण्याची प्रक्रिया महापालिका स्तरावर सुरू आहे.वाल्हेकरवाडी, थेरगावातील नागरिकांचे काय होणार?रिंगरोडला थेरगाव, काळेवाडी, वाल्हेकरवाडी परिसरातून मोठा विरोध होत आहे. रिंगरोडमध्ये मोठ्या प्रमाणावर घरे असल्याने पर्यायी मार्गाचा विचार करावा, असे रिंगरोडबाधितांचे म्हणणे आहे. रिंगरोडविरोधी आंदोलनात भाजपाही नागरिकांच्या बाजूने आहे, असे दाखविते.मात्र, दुसरीकडे या संदर्भातील प्रशासकीय कार्यवाही सुरू झालेली आहे. त्यातच प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्याने आता रिंगरोडबाधितांचे काय होणार? मुंढे यांना सत्ताधाºयांनी रिंगरोड करण्यासाठीच शहरात आणले आहे, अशी चर्चा आहे. रिंगरोडवरून सत्ताधारी भाजपाची कोंडी होणार आहे.

टॅग्स :Puneपुणे