शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

नदी स्वच्छता चळवळ व्हावी, जलपर्णीमुक्त पवनामाई अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 01:08 IST

रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीच्या वतीने सुरू करण्यात आलेले ‘जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई’ हे अभियान केवळ अभियान न राहता ही स्वच्छतेची चळवळ व्हायला हवी, असे मत खेलरत्न व अर्जुन पुरस्कार विजेत्या व महपालिकेच्या स्वच्छता दूत अंजली भागवत यांनी व्यक्त केले.

पिंपरी : रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीच्या वतीने सुरू करण्यात आलेले ‘जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई’ हे अभियान केवळ अभियान न राहता ही स्वच्छतेची चळवळ व्हायला हवी, असे मत खेलरत्न व अर्जुन पुरस्कार विजेत्या व महपालिकेच्या स्वच्छता दूत अंजली भागवत यांनी व्यक्त केले.रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीच्या वतीने ‘जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाला तीन महिने पूर्ण झाली आहेत. रविवारी हे ‘जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई’ अभियान रावेत बंधारा येथे राबविले. या मोहिमेत दूत अंजली भागवत यांनी सहभाग घेतला. या वेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.रावेत बंधारा येथील ‘जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई’अभियानात महापालिकेचे सहायक आयुक्त दिलीप गावडे, ब प्रभाग सहायक आयुक्त संदीप खोत, देश का सच्चा हिरो असे नरेंद्र मोदी यांनी गौरविलेले चंद्रकात कुलकर्णी, अमित गोरखे, हेमंत गावंडे, जलबिरादरीचे नरेंद्रभाई चुग, नगरसेविका करुणा चिंचवडे, रोटरीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, सचिव दीपक वाल्हेकर, मयूर वाल्हेकर, जगन्नाथ फडतरे, सोमनाथ हरपुडे आदी अभियानात सहभागी झाले. तसेच पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम, पर्यावरण संवर्धन समिती, वृक्षवल्ली, सावरकर मित्र मंडळ, शेखर चिंचवडे यूथ फाउंडेशन, एसकेएफ कंपनी एम्प्लॉयर्स ग्रुप, हरीष मोरे मित्र परिवार, संस्कार प्रतिष्ठान, लेवा शक्ती महिला बचत गट, अमित मोगातरो आदींनी सहभाग घेतला.अंजली भागवत म्हणाल्या, ‘सौंदर्याने नटलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचे सौंदर्य टिकवणे आपल्या हातात आहे. आपण समाजाचा घटक म्हणून, माझ्या स्वत:साठी हे पर्यावरण आहे असे समजून ‘जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई’ अशा अभियानामध्ये सहभागी व्हायला हवे. प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर पर्यावरण स्वच्छतेची सुरुवात केली, तर पिंपरी-चिंचवड शहर देशात अग्रेसर राहील.’’>रावेत ते दापोडीपर्यंत काढणार जलपर्णीपाच ट्रक जलपर्णी बाहेर काढली. सोमनाथ मुसुडगे यांनी जलपर्णीच्या वाढीविषयी व निर्मूलनाविषयी माहिती सांगितली. सुनील कवडे यांनी लग्नाच्या तेविसाव्या वाढदिवसानिमित्त या स्वच्छता अभियानाला आर्थिक मदत केली. हेमंत गावांदे यांनी पाच हजार रुपये तर सचिन खोले यांनी एक हजार एक रुपयांची देणगी दिली. पुढील आठवडाभर रावेतपासून ते दापोडीपर्यंतची जलपर्णी काढण्यात येणार आहे. सोमवारी अभियानाच्या शंभराव्या दिवशी रावेत बंधारा येथे हे अभियान राबविण्यात येणार आहे.