शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीतील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 03:04 IST

तीर्थक्षेत्र आळंदीतील स्थानमाहात्म्य जोपासत येथील पुरातन जलकुंडांचे जलस्रोत पुनरुज्जीवित करण्याच्या मोहिमेला रविवारी सुरुवात करण्यात आली. या मोहिमेंतर्गत आळंदीतील भागीरथी कुंड, कोटी कुंड, रामकुंड आदी सुमारे ५१ पुरातन जलस्रोत कुंडांची स्वच्छता करण्यात येणार आहे.

आळंदी - तीर्थक्षेत्र आळंदीतील स्थानमाहात्म्य जोपासत येथील पुरातन जलकुंडांचे जलस्रोत पुनरुज्जीवित करण्याच्या मोहिमेला रविवारी सुरुवात करण्यात आली. या मोहिमेंतर्गत आळंदीतील भागीरथी कुंड, कोटी कुंड, रामकुंड आदी सुमारे ५१ पुरातन जलस्रोत कुंडांची स्वच्छता करण्यात येणार आहे. याबरोबरच इंद्रायणी नदीपात्रातील कचरा काढून इंद्रायणी नदी परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे येथील सर्वच जलस्रोत मोकळा श्वास घेणार आहेत.या स्वच्छता मोहिमेस उपनगराध्यक्ष सागर भोसले यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. तसेच पुणे येथील गायत्री परिवाराच्या कार्यकर्त्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. या परिवाराचे शैलेंद्र पटेल यांनी इंद्रायणी नदीलगत असलेल्या रामकुंडासमोर जुने जलस्रोत तसेच त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी यंत्रणा विकसित करून भाविकांना शुद्ध तीर्थ पिण्यास सोयीचे व्हावे यासाठी संकल्प केला. या प्रसंगी आळंदीतील सामाजिक कार्यकर्ते सुरेश दौंडकर, सखाराम गवळी, दत्तात्रय काळे आदी उपस्थित होते.गोपाळपुरातील पुरातन कुंड रस्तारुंदीकरण बाधित होऊ नये यासाठी परिसर स्वच्छ करून पुरातन कुंड परिसर मोकळा करण्यात आले. येथील झुडपे, वाढलेले गवत तसेच पालापाचोळा हटविण्यात आला. या वेळी उपनगराध्यक्ष सागर भोसले यांनी पुरातन वास्तू व कुंड हे तीर्थक्षेत्र आळंदीची जुनी ओळख असल्याने त्यांचे जतन केले जाईल असे सांगितले.देहूनंतर आळंदीत नदीची स्वच्छता करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. या कार्याचा भाग म्हणून आळंदीतील इंद्रायणी नदीची तसेच पुरातन कुंडांची स्वच्छता सेवकांनी उत्साहात केली. या स्वच्छता मोहिमेत युवक तरुणाचा तसेच महिला सदस्यांचा प्रतिसाद मिळाला.तीन वर्षांपासून नदी स्वच्छता मोहीमगेल्या ३ वर्षांपासून देहू येथील इंद्रायणी नदीसह देहूतील नदीघाटाची स्वच्छता गायत्री परिवाराच्या वतीने राबविली जात आहे. याच मोहिमेत आता देहूप्रमाणे आळंदीला जोडण्यात येत असल्याचे पुणे गायत्री परिवाराचे आशिष यांनी सांगितले. दर महिन्यातील शेवटच्या रविवारी देहू आणि आळंदीत रोटेशन पद्धतीने स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची देहूप्रमाणे आळंदीत उत्साहात सुरुवात झाली. देहूत रानजाई प्रकल्पाचे सोमनाथ आबा यांचे मार्गदर्शन झाल्याचे आशिष यांनी सांगितले.नदीपात्राने घेतला मोकळा श्वासआळंदी येथील स्वच्छता मोहिमेत नदीपात्रातील कचरा, कपडे, प्लॅस्टिक बाटल्या, पिशव्या, जीर्ण फोटो फ्रेम्स, काचा, फुलांचे निर्माल्य आदी दाताळ्यांचा वापर करून बाहेर काढण्यात आले. या मोहिमेत सुमारे एक हजार किलोवर कचरा नदीपात्रातून बाहेर काढून नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकडे घंटागाड्यातून देण्यात आले.

टॅग्स :Waterपाणी