दुबईच्या धर्तीवर साकारणार व्हर्टिकल गार्डन, पिंपळे गुरवच्या राजमाता जिजाऊ उद्यानाचे नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 05:10 AM2017-11-19T05:10:39+5:302017-11-19T05:10:49+5:30

येथील गावठाणातील साडेसात एकर जागेत महापालिकेच्या वतीने चार कोटी चाळीस लाख रुपयेचे दुबईच्या धर्तीवर राजमाता जिजाऊ उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे.

Renovating the Jijau Garden of Rajmata, Vimal Garden, Pimple Gurav, on the lines of Dubai | दुबईच्या धर्तीवर साकारणार व्हर्टिकल गार्डन, पिंपळे गुरवच्या राजमाता जिजाऊ उद्यानाचे नूतनीकरण

दुबईच्या धर्तीवर साकारणार व्हर्टिकल गार्डन, पिंपळे गुरवच्या राजमाता जिजाऊ उद्यानाचे नूतनीकरण

googlenewsNext

पिंपळे गुरव : येथील गावठाणातील साडेसात एकर जागेत महापालिकेच्या वतीने चार कोटी चाळीस लाख रुपयेचे दुबईच्या धर्तीवर राजमाता जिजाऊ उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, मार्च अखेरीस दुस-या टप्प्यात व्हर्टिकल गार्डन साकारण्यात येणार आहे.
महापालिकेने २००६ मध्ये राजमाता जिजाऊ या उद्यानाची निर्मिती केली. पिंपरी-चिंचवड शहरासह उपनगरातील नावाजलेल्या उद्यानापैकी हे एक भव्य-दिव्य उद्यान आहे. हे उद्यान पिंपळे गुरव किंवा सांगवी पुरतेच न राहता पिंपरी-चिंचवडच्या वैभवात भर टाकणार आहे.
या उद्यानातील पन्नास फुटी डायनासोर हे मुख्य आकर्षण आहे. या उद्यानाच्या नूतनीकरणासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी पाठपुरावा केला होता. २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात अर्थिक तरतूद करण्यात आली होती. दुबई येथे विकसित केल्या जाणाºया व्हर्टिकल गार्डन या संकल्पनेच्या आधारावर हा दुसरा टप्पा असणार आहे.

व्हर्टिकल गार्डनची वैशिष्ट्ये
व्हर्टिकल गार्डन, भव्य तिकीटघर व चार प्रवेशद्वार थ्रीडी गेट, एव्हेंजर वॉल, फ्रील, चंद्रकोर आकारात ४२ बाय १४ आकाराचे भव्य कारंजे, वॉकिंग ट्रॅक, हरी वॉटर हाऊस, फ्लावर लेक, विविध रंगी फुलांच्या बागा, दीड लाख लिटर पाण्याची टाकी, दोन स्वच्छतागृह, चार फूट उंची असलेल्या सुरक्षा भिंतीची आडीच फुटाची उंची वाढविणे, वाहनव्यवस्था आदी कामे पूर्ण होणार आहेत.

तीन महिने पावसामुळे कामाला कमी गती होती़ आता पावसाने उघडीप दिल्यामुळे कामास वेग येत आहे. सद्य:स्थितीत कामामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही. युद्धपातळीवर काम सुरू आहे. चार महिन्यांपर्यंत काम पूर्णत्वास येईल.
- संजय कांबळे,
कार्यकारी अभियंता

सुरू असलेल्या कामाची पाहणी आणि पाठपुरावा करतो. कामामध्ये काही बदल असल्यास दुरुस्ती करून घेतो. सध्या उद्यानातील वॉकिंग ट्रॅक नूतनीकरणाच्या कामामुळे बंद आहे. ही गैरसोय एक महिन्यात दूर करण्याचा प्रयत्न आहे.
- शशिकांत कदम, ड प्रभाग अध्यक्ष

Web Title: Renovating the Jijau Garden of Rajmata, Vimal Garden, Pimple Gurav, on the lines of Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.