शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरातील कपातीने पीएमपीला दिलासा, डिझेलवरील दररोजचा खर्च ४ लाखांनी झाला कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 01:34 IST

मागील काही महिन्यांत सतत होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) आर्थिक गणित कोलमडले होते.

पिंपरी : मागील काही महिन्यांत सतत होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) आर्थिक गणित कोलमडले होते. मात्र, डिसेंबर महिन्यात इंधनाच्या दरात कपात झाल्याने पीएमपीएमएलला मोठा दिलासा मिळाला. रोजचा डिझेलवर होणारा चार लाखांचा खर्च कमी झाल्याने पीएमपीएमएलचे आर्थिक गणित जुळले आहे.पीएमपीला दररोज ३८ हजार लिटर डिझेल लागते. मात्र, इंधनदरवाढीमुळे पीएमपीला आर्थिक झळ सहन करावी लागली होती. सप्टेंबर महिन्यात लिटरमागे सुमारे ६ रुपये २६ पैशांनी डिझेल महागले होते. त्यामुळे पीएमपीचे आर्थिक गणित कोलमडले होते. दरम्यान, पीएमपी प्रशासनाने तिकीट दर वाढीचाही प्रस्ताव ठेवला होता. मात्र, तो प्रस्ताव संचालक मंडळाने फेटाळला. जुन्या गाड्या, कमी झालेले प्रवासी तर दुसरीकडे देखभाल दुरुस्तीसाठी लागणारा खर्च त्यामुळे पीएमपीचे आर्थिक घडी विस्कटली होती. दरम्यान, डिझेलच्या दरात १० रुपये ९५ पैशांनी घट झाल्याने डिझेलवरील रोजचा सुमारे चार लाखांचा खर्च कमी झाला आहे.पीएमपीमध्ये ५७१ बस सीएनजीच्या आहेत. तर ८५० पेक्षा जास्त बस डिझेलवर चालतात. दररोज पीएमपीला साधारण ३८ हजार लिटर डिझेल खरेदी करावे लागते.पीएमपीच्या अनेक बस सीएनजी गॅसवर चालतात. सीएनजी बस वापरामुळे पीएमपीचे पैसेही वाचतात. मात्र, सीएनजी दरातही किलोमागे तीन रुपये वाढले होते.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड