शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील : एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 02:11 IST

मुंबई ते नागपूर दरम्यान बांधण्यात येणाºया समृद्धी महामार्गासाठी शेतकºयांना तातडीने मोबदला दिला असल्याने जमिनीचे भूसंपादन गतीने झाले आहे.

देहूरोड  - मुंबई ते नागपूर दरम्यान बांधण्यात येणाºया समृद्धी महामार्गासाठी शेतकºयांना तातडीने मोबदला दिला असल्याने जमिनीचे भूसंपादन गतीने झाले आहे. आवश्यक जमीन ताब्यात आली आहे. या महामार्गाचा शेतकºयांना फायदा होणार असून, शेतकºयांच्या आत्महत्या नक्कीच कमी होतील, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी देहूरोड येथे केले.मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील निगडी ते देहूरोड या सव्वासहा रस्त्याचे चौपदरीकरण व देहूरोड येथील एक किलोमीटर अंतराच्या उड्डाणपुलाच्या कामाचा लोकार्पण सोहळा शिंदे यांच्या हस्ते झाला. त्या वेळी शिंदे बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट हे अध्यक्षस्थानी होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्षा सारिका नाईकनवरे, सीईओ अभिजित सानप, सदस्य विशाल खंडेलवाल, ललित बालघरे, अ‍ॅड़ अरुणा पिंजण, हाजीमलंग मारीमुत्तू, गोपाळराव तंतरपाळे, नगरसेवक सुनील शेळके, रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता प्रशांत औटी, मुख्य अभियंता दि. द़ उकिर्डे, कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी खासदार बारणे, आमदार भेगडे यांनी मनोगतात विविध मागण्या केल्या.शिंदे म्हणाले, ‘‘दुर्गम भागातील शेतकºयांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील रखडलेले ट्रामा सेंटर या महिनाअखेर सुरू करण्यात येणार आहे. खंडाळा-लोणावळा घाटातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी दहा किलोमीटर अंतराचा बोगदा बांधण्याच्या कामाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, संबंधित काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. दळणवळण यंत्रणा सक्षम असते, त्या भागातील विकास व प्रगती वेगात होत असल्याने चांगल्या प्रकारचे रस्ते देण्यासाठी महामंडळ कार्यरत आहे. द्रुतगती मार्गालगत सेवा रस्ता देता येत नाही. मात्र वीस किलोमीटर भागात शंभर फुटी रस्त्याचे सर्वेक्षण सुरू केले असून, पीएमआरडीच्या माध्यमातून रस्त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. संत तुकाराममहाराज पालखी मार्गावर निगडीपर्यंत भाविकांसाठी पादचारी मार्ग बांधणे प्रस्तावित आहे.नागरिक काँग्रेसला घरचा मार्ग दाखविणारकाँग्रेसवाल्यांना उभ्या आयुष्यात बाराशे कोटी कशाला म्हणतात हे माहिती नव्हते. आज ते परिवर्तन यात्रा काढू लागले. आता लोकं परिवर्तन करणार म्हणजे तुम्हाला घरचा मार्ग दाखविणार हे लक्षात ठेवा. केंद्र सरकारच्या माध्यमातून पालखी मार्ग प्रश्न मार्गी लागला आहे. राज्यातील सात कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी राज्य सरकारने निधी दिला आहे. आगामी काळात कॅन्टोन्मेंट बोर्ड बंद करून नगरपालिका अगर नगरपंचायत स्थापन करण्याची गरज आहे. सत्तर वर्षात जी कामे झाली नाहीत ती पाच वर्षांत झाली आहेत.- गिरीश बापट, पालकमंत्री

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेFarmerशेतकरी