शहरं
Join us  
Trending Stories
1
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
2
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
3
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
4
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
5
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
6
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
7
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
8
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
9
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
11
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
12
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
13
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
14
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
15
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
16
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
17
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
18
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
19
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?

आपली कर्तव्ये ओळखावीत - स्वामी स्वरूपानंद सरस्वती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 03:32 IST

प्रत्येक माणसाने आपली कर्तव्ये ओळखली पाहिजेत. परंतु माणसाला आपली कर्तव्ये लक्षात येत नाहीत, कारण माणूस इतरांच्या चुका काढण्यात आपले जीवन वाया घालवत आहे.

चिंचवड : प्रत्येक माणसाने आपली कर्तव्ये ओळखली पाहिजेत. परंतु माणसाला आपली कर्तव्ये लक्षात येत नाहीत, कारण माणूस इतरांच्या चुका काढण्यात आपले जीवन वाया घालवत आहे. आपले निरीक्षण करण्याऐवजी केवळ इतरांचेच निरीक्षण करण्यात आपले जीवन वाया जात असल्याचे मत स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी व्यक्त केले.श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी यांचा ४५६ वा संजीवन समाधी महोत्सव सोमवारी चिंचवड येथे श्री मोरया गोसावी समाधी मंदिर पटांगणावर (देऊळमळा) येथे उत्साहात सुरू झाला. समाधी सोहळ्याचे उद्घाटन परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.समाधी महोत्सव सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी खासदार श्रीरंग अप्पा बारणे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार जगन्नाथ देवमहाराज, विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, नगरसेवक सुरेश भोईर, गजानन चिंचवडे, उद्योगपती माऊली घोगरे, सहायक अधिकारी संदीप खोत आदी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांनी उद्घाटन सोहळ्यापूर्वी मोरया गोसावी मंदिरास भेट दिली.महासाधू मोरया गोसावी यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त ट्रस्टतर्फे तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे कार्यक्रमावेळी प्रकाशन करण्यात आले. या १२ दिवसांच्या समाधी महोत्सव सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम, होम हवन, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिर, प्रवचन, भजन व मराठी सुगम संगीताचे कार्यक्रम होणार आहेत. सुप्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर, जितेंद्र अभ्यंकर, आनंद भाटे, तौफिक कुरेशी यांचे गायन व वादनाचे कार्यक्रम होणार आहेत.खासदार श्रीरंग बारणे यांनी समाधी सोहळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच विश्वस्त अ‍ॅड. राजेंद्र उमाप, विनोद पवार व नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनीही उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन डॉ. चारुदत्त देशपांडे यांनी तर प्रास्ताविक विश्वस्त विशाल देव यांनी केले, तर आभार विश्वस्त आनंद तांबे यांनी व्यक्त केले.विचाराच्या कक्षा : प्रेरणेतून श्रद्धा येतेस्वामी स्वरूपानंद सरस्वती म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक गोष्टीबाबत प्रेरणा असते. त्याच प्रेरणेतून श्रद्धा येते. आपले जीवन घडविण्यामध्ये बºयाच लोकांचा सहभाग असतो, त्या सर्वांबद्दल असणारी आदराची भावनादेखील श्रद्धाच असते. ही श्रद्धा म्हणजेच परमेश्वराचे अस्तित्व आहे. संकुचित विचार करण्याची प्रवृत्ती मानवी विकासासाठी घातक आहे़ त्यामुळे विचारांच्या कक्षा विस्तृत करायला हव्यात. जी व्यक्ती केवळ भौतिक सुख आणि वासनेसाठी जगते अशा व्यक्तीमध्ये आणि पशुंमध्ये काहीही फरक नसतो. पशुंपेक्षा वेगळी शक्ती निसर्गाने आपल्याला दिली आहे. त्या विचारशक्तीने सद्विवेकाचा विचार करून जीवनाचे सार्थक करायला हवे.

टॅग्स :Puneपुणे