शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

रावेत बंधाऱ्याची ५१० एमएलडी पाणी साठवणूकक्षमता वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 01:48 IST

शहराला पाणीपुरवठा करणाºया रावेत बंधाºयाची उंची वाढविण्यासाठी पवना नदीपात्राचे ड्रोनद्वारे आठ किलोमीटर सर्वेक्षण केले.

पिंपरी : शहराला पाणीपुरवठा करणाºया रावेत बंधाºयाची उंची वाढविण्यासाठी पवना नदीपात्राचे ड्रोनद्वारे आठ किलोमीटर सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात नदीपात्रात दोन ठिकाणी मोठ्या उंचीचे खडक आढळले असून, अर्ध्या मीटरने बंधाºयाची उंची वाढविल्यास २५० एमएलडी; तर एक मीटर उंची वाढविल्यास पाणी साठवण क्षमतेमध्ये ५१० एमएलडीची वाढ होणार आहे. यासाठी लवकरच पाहणी दौरा केला जाणार आहे.पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. पवना नदीवरील रावेत येथील बंधाºयातून पाणी उचलले जाते. पन्नास वर्षांहूनअधिक काळ या बंधाºयास झाले आहेत. शहराची लोकसंख्यावाढली आहे. तसेच, बंधाºयाची साठवण क्षमता कमी झाली आहे. सद्य:स्थितीत रावेत बंधाºयातून महापालिका ४८० एमएलडी, एमआयडीसी १२० एमएलडी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ३० एमएलडी जलउपसा करते. हा बंधारा पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित आहे. देखभाल-दुरुस्ती पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येते.असे झाले सर्वेक्षणहा बंधारा जुन्या काळी बांधला असल्याने सद्य:स्थितीत येथे पाणी साठवणूक क्षमता जलउपशाच्या अनुषंगाने कमी असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी केलेल्या पाहणीत आढळून आले. त्यानंतर महापालिकेने ड्रोनद्वारे आठ किलोमीटर सर्वेक्षण केले. जॅकवेलपासून अनुक्रमे चार व २६ मीटर अंतरावर दोन ठिकाणी मोठ्या उंचीचे खडक आढळले आहेत.पूरनियंत्रण रेषेपेक्षा बॅकवॉटरची उंची कमीया सर्वेक्षणात अर्धा व एक मीटर उंचीवाढविल्यास रावेत बंधाºयापासून आठ किलोमीटरपर्यंत पाण्याची उंची किती असू शकेल, याची मोजणी केली. त्यामध्ये पूरनियंत्रण रेषेचादेखील अभ्यास केला. त्यानुसार पूर नियंत्रणरेषेनुसार ५६५ डॅम टॉप उंची असणार आहे, तर एक मीटरने बंधाºयाची उंची वाढविल्यास पाण्याची पातळी ५६२.७ एवढी उंची असणार आहे. याशिवाय सध्या पवना बंधाºयाची लांबी २०० मीटर असून, उंची वाढविल्यास या बंधाºयाची लांबी ३० मीटरने वाढणार आहे.अर्धा मीटर उंची वाढविणारबंधाºयाची उंची वाढविण्याचे दोन प्रस्ताव विचाराधीन आहेत. अर्धा मीटरने बंधाºयाची उंची वाढविल्यास बंधाºयाची पाणी साठवणक्षमता अडीचशे एमएलडीने वाढणार आहे. तर एक मीटरने उंची वाढविल्यास दुपटीने म्हणजेच पाचशे एमएलडी पाणी साठवणूकक्षमता वाढणार आहे. यासाठी जलसंपदा विभागाला सर्वेक्षण अहवाल सादर केल्यानंतर महापालिका व जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांच्या उपस्थितीत बंधाºयाची संयुक्त पाहणी केली जाणार आहे.

टॅग्स :ravetरावेतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड