रहाटणी : प्रभाग क्रमांक २७ रहाटणी-काळेवाडीमधील राष्ट्रवादीचे उमेदवार नगरसेवक कैलास थोपटे, विशाल भालेराव, अनिता तापकीर, सविता नखाते यांच्या प्रचारासाठी रविवारी सायंकाळी रॅली काढण्यात आली. रविवार सुटीचा दिवस असल्याने उमेदवारांसह महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभाग घेतला. आवाज कुणाचा... आवाज जनतेचा... या राष्ट्रवादीच्या गीताने प्रचार रॅलीत चांगली रंगत आणली.नगरसेवक कैलास थोपटे यांच्या संपर्क कार्यालयापासून रविवारी दुपारी ४ वाजता रॅलीला सुरुवात झाली. तर रहाटणी गावठाण, पवनानगर, गंगानगर, पठारे चाळ, तांबे चाळ, नखाते वस्ती भाग, नखातेनगर, गजानननगर, शिवराजनगर, श्रीनगर, शिवतीर्थनगर, रायगड कॉलनी परिसर, वृंदावन कॉलनी परिसर, तापकीरनगर, तापकीर मळा परिसर, जोतिबा कॉलनी आदी ठिकाणी रॅलीचे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. रहाटणीगाव-काळेवाडी प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत प्रचार घराघरांत पोहचवीत आहेत. या वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार विशाल भालेराव, नगरसेवक कैलास थोपटे, नगरसेविका अनिताताई तापकीर, सविता नखाते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी हातात राष्ट्रवादीचे झेंडे घेऊन जयघोष केला. रॅली दरम्यान, रहाटणी-काळेवाडी परिसरात राष्ट्रवादीच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांची माहिती देणारी आॅडिओ क्लिप मतदारांना ऐकविण्यात आली. ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ, यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा करत पुन्हा सेवेची संधी द्या, अशी विनंती केली. (वार्ताहर)
राष्ट्रवादीच्या गीताने प्रचार रॅलीत रंगत
By admin | Updated: February 13, 2017 01:44 IST