शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

संतपीठावर राजकीय व्यक्तींना ठेवले दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 00:12 IST

विधी समितीमध्ये शिक्कामोर्तब : बहुमताने ठरावाला मंजुरी

पिंपरी : महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराममहाराज संतपीठामध्ये सीबीएससी बोर्डाचा अभ्यासक्रम असून, त्यासाठी महापालिकेतर्फे संचालक मंडळाची रचना जाहीर केली आहे. संतपीठावर राजकीय व्यक्तींना दूर ठेवण्यावर विधी समितीने शिक्कामोर्तब केले. ठरावाच्या बाजूने पाच, तर विरोधात चार मते पडली. प्रशासकीय समिती करण्यास राष्टÑवादी आणि शिवसेनेने विरोध दर्शविला आहे.

वारकरी संप्रदायाचा प्रसार व प्रचार व्हावा, पारंपरिक शिक्षण मिळावे, या उद्देशाने हे संतपीठ उभारण्यात येत आहे. या संतपीठ उभारणीला १३ मे २०१५ रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता दिली होती. ती देण्यात आल्यानंतर माध्यमिक शाळेसाठी आरक्षित चिखलीतील १ हेक्टर ८० गुंठे जागा महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. यात निवासी स्वरूपाचे, प्राथमिक शाळेपासून ते उच्च पदवीपर्यंतचे केवळ संतसाहित्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. येथे वसतिगृह, सभागृह, अभ्यासवर्ग आदींचा समावेश असणार आहे. येथील शाळेमध्ये सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना प्रवेश असून, हे संतपीठ मराठी माध्यमातून शिक्षण देणारे असणार आहे.सुमारे ४५ कोटी रुपये इतका खर्च या संतपीठ उभारणीसाठी येणार आहे. ना नफा ना तोटा तत्त्वावर कंपनी स्थापन केली आहे. संतपीठामध्ये मुलांचे शिक्षण सीबीएससी बोर्डाचे होणार आहे.असे आहे संचालक मंडळमहापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ जणांचे संचालक मंडळ स्थापन केले आहे. पदसिद्ध संचालक आणि पदसिद्ध सचिव म्हणून मुख्य लेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे, प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, माध्यमिकचे प्रभारी शिक्षणाधिकारी पराग मुंढे आणि कायदा विभागाचे प्रभारी कायदा सल्लागार चंद्रकांत इंदलकर हेही पदसिद्ध सदस्य आहेत. याशिवाय संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, हभप राजूमहाराज ढोरे, तानाजी शिंदे आणि तज्ज्ञ सल्लागार स्वाती मुळे हे सदस्य असणार आहेत. येत्या सर्वसाधारण सभेत हा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे