शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

स्पा सेंटरच्या आड देहविक्रीचा धंदा; सात महिलांची सुटका

By नारायण बडगुजर | Updated: November 30, 2025 19:35 IST

सांगवी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पिंपळे सौदागरमध्ये धाड टाकत प्रतिष्ठित ‘द ओरा थाई स्पा’च्या नावाखाली सुरू असलेला वेश्या व्यवसाय उध्वस्त केला. सात महिलांची सुटका करीत स्‍पा सेंटरच्‍या मालकास अटक केली आहे.

स्पामध्ये उच्चभ्रू ग्राहकांसाठी मसाजच्या नावाखाली देहविक्री केली जात असल्याची खात्रीशीर माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून शहानिशा केली आणि नंतर ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत सात महिलांची सुटका केली असून त्यापैकी ५ ईशान्य राज्यांमधील (३ नागालंड, १ मिजोराम, १ त्रिपुरा) तसेच केरळ आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एक असे एकूण सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

अभिजित लाॅरेन्स (वय ३०, रा. पिंपळे सौदागर, मूळ रा. तिरुअनंतपुरम, केरळ) असे अटक केलेल्‍या स्‍पा मालकाचे नाव आहे. याबाबत गुन्‍हे शाखेच्‍या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलिस हवालदार श्रद्धा राजेश भरगुडे (वय ३९) यांनी शनिवारी (दि. २९) सांगवी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अभिजित लाॅरेन्स हा महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना देहव्यापारास प्रवृत्त करत असत. या माध्यमातून तो मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळवत होता, असे तपासात समोर आले आहे. संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता व पिटा कायद्यान्वये सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सांगवी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्‍त डाॅ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते, सहायक निरीक्षक भास्कर पुल्ली व पथकाने ही कारवाई केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Spa Center Brothel Busted; Seven Women Rescued in Pimpri

Web Summary : Pimpri-Chinchwad police raided a spa in Pimple Saudagar, uncovering a prostitution racket. Seven women, including those from Northeast India and Kerala, were rescued, and the spa owner was arrested for allegedly forcing them into prostitution for financial gain. An investigation is underway.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड