शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या स्मार्ट आराखड्यास स्थगिती, औद्योगिक न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 02:52 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपी) तयार केलेल्या आस्थापना आराखड्यास औद्योगिक न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे या आराखड्याची अंमलबजावणी लांबणीवर पडणार आहे.

पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपी) तयार केलेल्या आस्थापना आराखड्यास औद्योगिक न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे या आराखड्याची अंमलबजावणी लांबणीवर पडणार आहे. स्मार्ट आराखड्यानुसार विविध विभागातील पदे निम्म्याने कमी होणार असून, यातील निकषांचा फटका जुन्या कामगारांना बसणार असल्याचा आक्षेप पीएमटी कामगार संघाने (इंटक) घेतला होता.पूर्वीच्या आराखड्यात जनरल अ‍ॅडमिन विभागात १ हजार ७९३ पदे मंजूर होती. नवीन आराखड्यानुसार ती ७३२ करण्यात आली. वर्कशॉपमधील पदे २ हजार ५३० वरून ८५२, वाहतूक विभागातील पदे १० हजार १११ वरून ५ हजार १६० पदे करण्यात आली. नव्या आराखड्यानुसार ७ हजार ४२६ पदे कमी करण्यात आली.वाहकाची पदोन्नती स्टार्टर या पदावर झाल्यानंतर, ती २९०० ग्रेडपे अशी होत होती. ती २६०० रुपये करण्यात आली आहे. नव्याने येणाºया वाहकाचा ग्रेडपे हा चतुर्थश्रेणी कामगाराप्रमाणे २ हजार रुपये ठेवण्यात आला आहे. नवीन चालकालादेखील २ हजार ८०० रुपयांऐवजी २ हजार रुपये ग्रेडपे लागू करण्यात आला आहे. हाचप्रकार लेखनिक आणि इतर कर्मचाºयांच्या बाबतीत करण्यात आला आहे.जुन्या सेवकांच्या अनुभवाचा आणि शिक्षणाचा विचार नवीन आस्थापनेत करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होणार आहे. सुपरवायझर पदाकरिता आयटीआय व एनसीटीव्हीटी अशा शैक्षणिक पात्रता आवश्यक असताना, ती डिप्लोमा इंजिनियर अशी दाखविण्यात आली आहे. नवीन आस्थापना धोरण कामगारहितास बाधा पोहोचविणारे असल्याने औद्योगिक न्यायालयात दाद मागितल्याचे इंटक पुणेचे अध्यक्ष राजेंद्र खराडे व महासचिव नुरुद्दीन इनामदार यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे