शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

रोडरोमिओंचा त्रास, शाळा, महाविद्यालयांमध्ये भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 03:02 IST

निगडी येथील महापालिका शाळा, महाविद्यालय परिसरात मुलींना रोडरोमिओंचा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयात डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये काही वेळा वादावादीचे प्रसंग उद्भवतात.

निगडी - येथील महापालिका शाळा, महाविद्यालय परिसरात मुलींना रोडरोमिओंचा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयात डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये काही वेळा वादावादीचे प्रसंग उद्भवतात. असे प्रकार रोखण्यासाठी निगडी, यामुनानगर, सेक्टर २२ येथील शाळा महाविद्यालये तसेच रुग्णालय परिसरात महापालिकेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचीमागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.शाळा व महाविद्यालय परिसरात रोडरोमिओंचा उच्छाद वाढला आहे. शाळा भरताना व शाळा सुटताना शाळा व महाविद्यालय परिसरात रोडरोमिओ दुचाकीचा कर्णकर्कश हॉर्न वाजवत घिरट्या घालतात. या रोडरोमिओंना परिसरातील नागरिकांनी हटकल्यास परिसरातील नागरिकांना दमदाटी होते.यामुळे रोडरोमिओंवर नजर ठेवण्यासाठी शाळा महाविद्यालयासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी होत आहे. तसेच सेक्टर २२ मधील महापालिकेच्या दवाखाण्यात निगडी, यामुननागर, रुपीनगर आदी भागातून आपल्या नातेवाइकांसोबत रुग्ण तपासणीसाठी येत असतात. यामुळे या दवाखान्यात रोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते.रुग्णालयातही अनेकदा रुग्णांचे नातेवाईक व डॉक्टरांत वादावादीचे प्रसंग घडतात तसेच रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रोज मोठ्या रांगा असतात. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने दवाखाण्यासमोर सीसीटीव्ही बसविण्याची मागणी होत आहे. रुग्णालयात अनेकवेळा कामाशिवाय देखील नागरिक हिंडताना दिसून येतात.काही रोडरोमिओ भरधाव वेगाने गाड्या चालविताना त्यामुळे विद्यार्थिंनीना त्रास होत आहे. रोडिरोमिओंकडून कर्णकर्कश हॉर्न देखील वाजविला जातो. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो.भरधाव वेगाने हाकल्या जातात गाड्याकर्णकर्कश हॉर्नचा होतोय त्रासशहरात शाळा महाविद्यालये, दवाखाना परिसरात रोडरोमिओंचा उच्छाद वाढला आहे. यामुळे विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण आहे. यामुळे अशा रोडरोमिओंवर नजर ठेवण्यासाठी शाळा, महाविद्यालय व दवाखाण्यासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे.- तानाजी काळभोर, अध्यक्ष, खंडोबा देवस्थान ट्रस्ट,निगडीगाव

टॅग्स :Crimeगुन्हाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड