शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

भोसरीतील शिवसेनेच्या बैठकीत राडा, पदाधिकाऱ्यांमध्ये हमरी-तुमरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 15:05 IST

महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला सुटला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी...

पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या  आज (बुधवारी) आयोजित बैठकीत पदाधिका-यांमध्ये चांगलाच राडा झाला. पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार हमरी-तुमरी होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. 

भोसरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला होता. शिवसेनेकडे मतदारसंघ घेण्यासाठी मोठे प्रयत्न केले. परंतु,  महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला सुटला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. पुढील भूमिका ठरविण्यासाठी भोसरीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांची आज भोसरीत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत एक महिला पदाधिकारी आणि एका पदाधिकाऱ्यामध्ये जोरदार वादावादी झाली.

एक पदाधिकाऱ्यांने माजी खासदारांच्या कार्यशैलीबाबत नापसंती व्यक्त करत विविध आरोप केले. त्याला एका महिला पदाधिका-याने आक्षेप घेतला. त्यावरुन दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. रस्त्यावरच दोघांमध्ये भांडण झाले.

विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना महायुती आणि आघाडीच्या पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहे. यामध्ये तिकीट न मिळालेल्या नाराज उमेदवारांच्या नाराजीचे रूपांतर एकतर बंडखोरीत किंवा वादावादीत होत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये देखील शिवसेनेने आयोजित केलेल्या बैठकीत असाच राडा झालेला पाहायला मिळाला. आपला उमेदवार जाहीर केला आहे. बैठकीत झालेल्या वादावादीतून एका महिलेच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला आहे.

टॅग्स :bhosariभोसरीElectionनिवडणूकBJPभाजपाShiv Senaशिवसेना