शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

खासगीकरणाचा घाट, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 03:00 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनुभवी अभियंते कार्यरत असतानाही आता प्रत्येक कामासाठी वास्तुविशारद नेमण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी आॅनलाइन निविदाही मागविल्या असून, ५६ वास्तुविशारदांनी महापालिकेकडे नोंदणी केली आहे. त्यांना इमारत बांधकाम, लॅण्डस्केपिंग, इंटेरिअर डिझायनिंग अशा कामाच्या प्रकारानुसार ५० लाखांपासून १० कोटीच्या पुढील खर्चाच्या कामांसाठी नेमणूक केली जाणार आहे. त्यामुळे महापालिका तिजोरीवर आर्थिक भार येणार आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनुभवी अभियंते कार्यरत असतानाही आता प्रत्येक कामासाठी वास्तुविशारद नेमण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी आॅनलाइन निविदाही मागविल्या असून, ५६ वास्तुविशारदांनी महापालिकेकडे नोंदणी केली आहे. त्यांना इमारत बांधकाम, लॅण्डस्केपिंग, इंटेरिअर डिझायनिंग अशा कामाच्या प्रकारानुसार ५० लाखांपासून १० कोटीच्या पुढील खर्चाच्या कामांसाठी नेमणूक केली जाणार आहे. त्यामुळे महापालिका तिजोरीवर आर्थिक भार येणार आहे.महापालिकेच्या वतीने शहरात कोट्यवधी रुपयांचे विविध प्रकल्प राबविण्यात येतात. या अंतर्गत करण्यात येणाºया लॅण्डस्केपिंग, विविध प्रकारच्या इमारतींच्या संकल्पनांसाठी, बांधकामांसाठी आणि बांधकाम परवानगी घेण्यासाठी पुरेसे तांत्रिक नैपुण्य महापालिकेतील अधिकाºयांकडे उपलब्ध आहे. महापालिकेच्या अभियंत्यांना पगारही मोठ्याप्रमाणावर दिले जातात. कार्यक्षमता असतानाही खासगीरणाचा घाट घातला जात आहे.गेल्या काही वर्षात महापालिकेत रस्ते, उड्डाणपूल बांधण्यापासून भाजी मंडईच्या विस्तारापर्यंत सर्वच छोट्या-मोठ्या कामांसाठी वास्तुविशारद नेमण्याचे पेव फुटले आहे.या वास्तुविशारदांवर प्रकल्प रकमेच्या दोन ते अडीच टक्के रुपयांची उधळपट्टी केली जाते. महापालिकेत तज्ज्ञ अभियंते कार्यरत असतानाही आता प्रत्येक कामासाठी वास्तुविशारद नेमण्याचा घाट घातला आहे.वास्तुविशारदांचे पॅनेल तयार करण्यासाठी एकूण ५६ वास्तुविशारदांपैकी एकूण ४२ वास्तुविशारदांनी कागदपत्रे सादर केली आहेत. त्यांच्या कागदपत्रांची छाननी केली. त्यानुसार, त्यांना तीन प्रकारची कामे देण्यात येणार आहेत. पहिल्या गटातील वास्तुविशारदांना इमारत बांधकाम विषयक कामे देण्यात येणार आहेत. दुसºया गटातील वास्तुविशारदांना लॅण्डस्केपिंगची कामे, तिसºया गटातील वास्तुविशारदांना इंटेरिअर डिझायनिंगची कामे देण्यात येणार आहेत.वास्तुविशारदांचे पॅनेलवास्तुविशारदांचे पॅनेल तयार करण्यासाठी मसुदा तयार केला आहे. त्यास आयुक्तांनीही मान्यता दिली आहे. हे पॅनेल नियुक्त करण्यासाठी महापालिकेने जाहिरात दिली होती. त्यानुसार, पहिल्या गटात १९ वास्तुविशारदांनी तीन हजार रुपये महापालिका शुल्क आणि तीन हजार रुपये निविदा शुल्क भरून आॅनलाइन कागदपत्रे सादर केली. दुसºया गटात १५ वास्तुविशारदांनी नोंदणी केली. या वास्तुविशारदांना दिलेल्या मुदतीत आॅनलाइन पद्धतीने कागदपत्रे भरता आली नाहीत. त्यांच्याकडून महापालिका कोशागारात शुल्क भरून आॅफलाइन पद्धतीने कागदपत्रे घेतली. तर तिसºया गटातही आठ वास्तुविशारदांनी आणि चौथ्या गटात १४ वास्तुविशारदांनी आॅफलाइन नोंदणी केली. मात्र, त्यांनी आॅफलाइन पद्धतीनेही कागदपत्रे सादर केलेली नाहीत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड