शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

पीएमपीवर दगडफेक करणाऱ्यांना तुरुंगवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 01:35 IST

भारत बंद आंदोलनातील घटना : सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली

पुणे : भारत बंददरम्यान वडगावशेरी येथे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसवर दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाºया तिघांना न्यायालयाने ६ महिने सक्तमजुरी आणि प्रत्येकी १ हजार २०० रुपयांची शिक्षा सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी हा निकाल दिला.

सचिन भागवत देठे (वय २९) प्रदीप सुखदेव ठोकळे (वय ३३, दोघेही रा. सोमनाथनगर, वडगावशेरी) व शंकर विठ्ठल संगम (वय २८, रा. धर्मनगर, वडगावशेरी) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.

५ जुलै २०१० ला भारत बंद पुकारला होता. त्याचा परिणाम शहरातील सर्वच कामकाजावर झाला होता. घटनेच्या दिवशी पीएमपी बसचे चालक केशव नबाजी पवार व वाहक बाळू संभाजी खंडाळे त्यांची गाडी घेवून मनपावरून वडगावशेरीतील शुभम सोसायटी येथे शेवटच्या बस स्टॉपवर पोहोचले.

दुपारी ४ वाजून २५ मिनिटांनी बस वळवून घेत असताना आरोपी त्यांच्या दुचाकीवरून या पीएमपी बसजवळ आले. त्यानंतर आरोपींनी बसवर दगडफेक केली. आरोपींनी केलेल्या दगडफेकीत बसच्या काचा फुटून ५ हजार रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी ५ साक्षीदार तपासले. त्यातील पीएमपीच्या बस चालक व वाहकाची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयीन कामकाजात पोलीस हवालदार राहुल शिंदे यांनी मदत केली.आरोपींच्या कृत्यामुळे जिवाला धोकाआरोपींच्या कृत्यामुळे मानवी जीवनाला व वैयक्तिक सुरक्षेला धोका पोहोचू शकतो, त्यामुळे आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद अ‍ॅड. कोळी यांनी केला होता. तर ही घटना सार्वजनिक रस्त्यावर घडली. पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचे वर्तमान चित्र लक्षात घेता पीएमपीएल ही बससेवा सर्वसामान्य पुणेकरांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी जीवनवाहिनी आहे.अशा परिस्थितीमध्ये आरोपींचे हे कृत्य केवळ शासकीय मालमत्तेचे नुकसान करणारे नसून, समाजात दहशत पसरविणारेसुद्धा आहे. आज विविध ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेवर व बसवर होणारे वाढते हल्ले लक्षात घेता, आरोपी कोणत्याही क्षमेला पात्र नाहीत, आरोपींनी केलेल्या कृत्याबाबत त्यांना झालेल्या शिक्षेचा सकारात्मक प्रभाव समाजामध्ये पसरणे आवश्यक आहे. आरोपींनी केलेल्या कृत्याची कुठलीही विघातक प्रवृत्ती पुनरावृत्ती करणार नाही, असे न्यायाधीश गजानन नंदनवार यांनी निकालात नमूद केले आहे.

टॅग्स :jailतुरुंग